एक्स्प्लोर

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटीचा मोठा फटका! इंजिनिअरिंग, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया रखडणार; यंदा शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होणार?

NEET Exam Paper Leak: 'नीट युजी' पेपर फुटीचे पडसाद आता राज्यातील इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरही उमटू लागले आहेत.

NEET Exam Paper Leak: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट युजी' (NEET-UG) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचे पडसाद आता राज्यातील इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरही उमटू लागले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) 3 मे 2026 रोजी घेतलेली आणि 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिलेली 'नीट-यूजी 2026' परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील इंजिनिअरिंग (Engineering) आणि फार्मसी (Pharmacy) अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.

NEET Exam Paper Leak: ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांना 'नीट'चा आधार

राज्यातील इंजिनिअरिंगच्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी आणि बी.फार्मसीच्या (B.Pharmacy) 15 टक्के ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांसाठी 'नीट' परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. ऑल इंडिया कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे 'नीट'च्या गुणांवर आधारित असल्याने, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याशिवाय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला (CET Cell) आपली पुढील प्रक्रिया सुरू करता येणार नाही. परिणामी, सीईटी सेलची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सध्या अडचणीत सापडली आहे.

NEET Exam Paper Leak: पुनर्परीक्षेमुळे प्रक्रियेला लागणार ब्रेक

आता 21 जून रोजी 'नीट'ची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल लागण्यासाठी आणखी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच, जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत नीटचा निकाल हाती येईल. तोपर्यंत राज्यातील इंजिनिअरिंग आणि फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही. यामुळे नेहमी जून-जुलैमध्ये सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया यंदा थेट जुलैनंतरच सुरू होऊ शकेल.

NEET Exam Paper Leak: शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होण्याची शक्यता

प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे त्याचा थेट परिणाम नवीन शैक्षणिक सत्रावर (Academic Session) होणार आहे. कॉलेज सुरू होण्यास आधीच उशीर झाल्यास, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्राध्यापक आणि कॉलेज प्रशासनासमोर असणार आहे. वारंवार होणाऱ्या या परीक्षांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे व चिंतेचे वातावरण आहे.

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका आरोपीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी बालरोगतज्ज्ञ असून डॉक्टर मनोज शिरुरे असं त्याचं नाव आहे. मनोज शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं. या चौकशीनंतर मनोज शिरुरेला सीबीआयने अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे हा मूळचा लातूरचा आहे. 

आणखी वाचा 

Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...; CBI थेट मॉडर्न कॉलेजमध्ये घुसली, मनीषा मांढरेच्या कपाट-लॉकरमध्ये काय मिळालं?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget