एक्स्प्लोर

Mumbai University : मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर,परीक्षांना कधीपासून सुरुवात होणार

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर  बीकॉम, बीएमएस च्या परीक्षा २३ ऑक्टोबर पासून, तर बीएससी च्या परीक्षा १३ नोव्हेंबर पासून सुरू होणार

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी 2024) मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.  चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे.  यंदा मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून होणार आहे. मुंबई विद्यापीठानं बी.कॉम, बीए, बीएस्सी यासह पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए या विद्याशाखांचा परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

हिवाळी सत्र 2024 साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र 5 च्या परीक्षा या 23 ऑक्टोबर 2024 पासून आयोजित केल्या जाणार आहेत. 

तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत. 

एलएलबी ( 3 वर्षीय) सत्र 5 आणि एलएलबी ( 5 वर्षीय) सत्र 9  ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित होणार आहे. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र 5 च्या परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून आयोजित केल्या जातील. 

यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही सोबतच्या परिपत्रकानुसार निर्गमित केला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

परीक्षांचा तारखा जाहीर, तयारीला लागा 

मुंबई विद्यापीठानं हिवाळी सत्रातील परीक्षाचं वेळापत्रक जाहीर केलं असून विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी अर्ज देखील दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी परीक्षांची देखील तयारी करणं आवश्यक आहे. 

इतर बातम्या :

नक्षलग्रस्त दुर्गम भागात पोहोचवली शिक्षणाची गंगा, गडचिरोलीच्या मंथय्या बेडकेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, दिल्लीत होणार सन्मान

MPSC Exam : गुड न्यूज, कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून नवा शासन आदेश जारी

मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivendraraje Bhonsle: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Embed widget