MPSC Civil Judge Merit List and Result 2022 Declared:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) Civil Judge Junior Division च्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) स्पर्धात्मक मुख्य परीक्षा 2020 (महाराष्ट्र दिवाणी न्यायाधीश परीक्षा) दिलेले उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे mpsc.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे.  या संकेतस्थळावर निकाल आणि गुणवत्ता यादी पाहता येऊ शकेल. 


> असा पाहता येईल निकाल: 


आयोगाने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणीचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. हा निकाल असा पाहता येईल. 


- निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी mpsc.gov.in  या संकेतस्थळावर लॉग इन करावे 
- संकेतस्थळावरील होमपेजवर  ‘Latest Updates’ या पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे 
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. 
- या नव्या पेजवरील  No. Click on the link '06/2021 Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 - Final Result/ /Recommendation list'या लिंकवर क्लिक करा. 
- यावर क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ फाइल उघडेल. त्यावर निकाल पाहता येईल 
- येथून निकाल डाउनलोड करता येईल. आवश्यकता असल्यास त्याची एक प्रिंटदेखील काढता येईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI