PhonePe: PhonePe या वर्षी डिसेंबरपर्यंत बंपर नोकऱ्या देईल, कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करेल



PhonePe : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe देशभरात त्याचे कर्मचारी वाढविणार आहे. कंपनीने म्हटलय की, सध्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2600 आहे. डिसेंबर 2022 पर्यंत त्यांचे एकूण कर्मचारी 5400 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस 2600 हून अधिक कर्मचारी नियुक्त करेल.


2800 जणांची नियुक्ती 
PhonePe ने मंगळवारी सांगितले की, "कंपनी पुढील 12 महिन्यांत बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये सुमारे 2,800 लोकांना विविध पदांवर नियुक्त करण्याची योजना आखत आहे." अभियांत्रिकी, उत्पादन, विश्लेषण, व्यवसाय विकास आणि विक्री संघ पदांवर या नियुक्त्या करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.


अधिक पॅकेजेसची ऑफर
कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना मार्केट स्टँडर्डपेक्षा जास्त पगाराचे पॅकेजेसची ऑफर केल्यामुळे कर्मचारी गळतीचे प्रमाण कमी आहे. यासोबतच, एम्प्लॉई शेअर ओनरशिप स्कीम (ESOP) द्वारे देखील सर्व कर्मचाऱ्यांना संपत्ती निर्माण करण्याची संधी देते. डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe देशभरात त्याचे कर्मचारी वाढवणार असून कंपनीने म्हटले आहे की डिसेंबर 2022 पर्यंत तिचे एकूण कर्मचारी 5400 पर्यंत दुप्पट होतील.


जाणून घ्या कंपनीचे प्रमुख काय म्हणाले
मनमीत संधू, मानव संसाधन प्रमुख, PhonePe म्हणाले, "आम्ही तंत्रज्ञानावर आधारित आणि सर्वांसाठी मूल्य निर्माण करणारी दीर्घकालीन शाश्वत संस्था तयार करत आहोत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :