Railway Recruitment : रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वेच्या अंतर्गत क्रीडा कोट्यातील 'गट क' च्या विविध भरतींच्या जाहीराती दिल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, २६ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत.

महत्वाच्या तारखाअर्ज करण्याची तारीख - 26 मार्चअर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल

रिक्त जागाएकूण पदांची संख्या- 21

पगार किती मिळेल?लेवल - 2: ग्रेड पे रु 1900 आणि पे बँड रु 5200-20200लेवल - 3: ग्रेड पे रु 2000 आणि पे बँड रु.5200-20200लेवल - 4 : ग्रेड पे रु 2400 आणि पे बँड रु. 5200-20200लेवल - 5: ग्रेड पे रु.28 आणि पे बँड रु.5200-20200

पात्रताउमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित खेळात वरिष्ठ, युवा किंवा ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे.

वय किती असावे?उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे.

अर्ज फीअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 250 रुपये आहे आणि सर्व उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रियाचाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूल्यांकनाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या :