Covid affects sperm at cellular level : कोविड 19 (Covid 19) नं गेल्या काही काळापासून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अजूनही हे संकट पूर्णपणे संपलेलं नाही. कोरोना झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला असल्याचंही समोर आलं आहे. कोरोनामुळं हृदय आणि न्यूरोलॉजिकल लक्षणं अनेकांना दिसली. मात्र आता आणखी एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. कोरोनामुळं शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचं IIT बॉम्बे आणि जसलोक हॉस्पिटलच्या प्रजनन केंद्राच्या नवीन संयुक्त अभ्यासात समोर आलं आहे. याचा परिणाम पुरुष प्रजनन प्रणालीवरही होत असल्याचं या अभ्यासात समोर आलं असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.


जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. फिरोजा पारीख आणि IIT बॉम्बे येथील प्रोटीओमिक्स प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कोविड-19नंतर शुक्राणूंच्या पेशींमधील प्रथिने विपरित पद्धतीनं बदलतात, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.   


'जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी' मध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चसाठी संशोधन पथकाने 20-45 वयोगटातील 27 पुरुषांच्या वीर्य नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यांच्यापैकी कोणालाही वंध्यत्वाचा पूर्वीचा इतिहास नव्हता. आम्हाला आढळले की बरे झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि कोविड-19 नसलेल्या पुरुषांपेक्षा कमी आकाराचे शुक्राणू आहेत, असं डॉ पारीख यांनी सांगितलं. 


डॉ श्रीवास्तव यांनी सांगितलं की, आयआयटी बॉम्बेच्या टीमने प्रति रुग्ण 1,000 प्रथिने तपासण्यासाठी अका मॅट्रिक्स तयार केला. त्यात आम्ही प्रगत लिक्विड क्रोमॅटोग्राफी-टँडम मास स्पेक्ट्रोमेट्री-आधारित प्रोटीओमिक्स वापरून या प्रथिनांचे विश्लेषण केले. त्यात असं आढळलं की, 27 जणांपैकी कोरोनामुक्त झालेल्या 21 पुरुषांमध्ये शुक्राणू कमी झाले होते. वीर्यातील प्रजनन संबंधित प्रथिने, सेमेनोजेलिन 1 आणि प्रोसापोसिन हे त्यांच्या नेहमीच्या पातळीपेक्षा निम्म्या होत्या.  डॉ पारीख म्हणाले की वीर्य पुरुष प्रजनन प्रणालीच्या एकूण कार्य प्रतिबिंबित करते. SARS-Cov-2 विषाणू पुरुष प्रजनन प्रणालीवर होऊ शकतो, असं तज्ञांनी म्हटलं आहे. 


डॉ श्रीवास्तव म्हणाले की, या रिसर्चसाठी आमच्याकडे मर्यादित नमुने होते. दुसरे म्हणजे हा एक प्रारंभिक अभ्यास आहे. आम्ही या रूग्णांना पुन्हा तपासण्यासाठी काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा बोलावणार आहोत. 


महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ शशांक जोशी म्हणाले की,  वृषणाच्या पेशींमध्ये ACE2 चे प्रमाण जास्त असल्याने पुरुषांवर कोविड-19 चा जास्त परिणाम झाला आहे.  कोविड-19 ने जागतिक स्तरावर स्त्रियांपेक्षा अधिक पुरुषांवर परिणाम झाला आहे.  हा एक शैक्षणिक निष्कर्ष आहे आणि एक गृहितक आहे. ज्याचा आपण प्रथम सशक्त क्लिनिकल निष्कर्षांशी संबंध ठेवला पाहिजे, असं ते म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha