Goa Assembly Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांसह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 


शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठीच्या बैठकीला उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार आहेत. उद्या शिवसेनेसोबत अंतिम चर्चा होईल त्यावर प्रफुल पटेल निर्णय जाहीर करतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 


"उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.


दरम्यान, गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि  ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही यावेळी आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं  सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे. 


गोव्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. गोवा विधानसभेत भाजपचे 25 आमदार असून नुकतेच आमदार कार्लोस अल्मेडिया आणि एलिना सलडाना यांनी राजीनामा दिला आहे.


महत्वाच्या बातम्या



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI