Mumbai: मुंबईतील आरेमध्ये वन्यजीवांचा रक्षण व्हावं आणि आरे मधील परिसराचा विकास व्हावा यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी, प्रकल्प पुढील काही दिवसात केले जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. यामध्ये आरेच्या परिसरात रस्ते, पथदिवे त्यासोबतच आरे मधील प्राणी सुरक्षित रहावे व त्यांना मोकळे फिरता यावे, त्यांचा वावर सर्वत्र करता यावा, यासाठी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आरे परिसरातून वाहतुकीसाठी त्या ठिकाणची नागरिक सोडून इतरांना बंदी घालण्यात येणार आहे. नव्या मुंबईच्या आरे जंगल परिसरमध्ये कशाप्रकारे विकासाची कामं येणार आहे.


मुंबईतील आरे परिसरात अनेक महत्त्वाची विकासाची कामे लवकरच केली जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यामध्ये आरे मधील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. जेणेकरून आरे परिसरात पाड्यावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा आत मध्ये रस्ते झाल्यास त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचणे अधिक सहज होईल. महत्वाचे म्हणजे, या पट्ट्यात वन्यजीवांचा विचार करता त्यांना मोकळीक मिळावी त्यांचे रक्षण व्हावे यासाठी आरे परिसर व त्यामधील रस्ते वाहतूक मी रात्री एक ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
 
विकासाची कोणती कामे केली जाणार?
- आरे परिसरातील मुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण  करणार...
- रस्ते रुंदीकरण किंवा कुठलेही झाड यासाठी तोडली जाणार नाही
- आरे रस्त्यावरील पथ दिव्यांचा प्रस्ताव 
- आरे मध्ये कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोयीसुविधा करणार
- आरे मधील अंतर्गत 45 किमी रस्ते त्यासोबत मुख्य रस्ता सुधारण्यासाठीचा काम केले जाणार
- अरे परिसरातील रस्ते सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार जेणेकरून वन्यजीवांना मोकळे फिरता येणार
 
या सगळ्या प्रश्नाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध विभागाच चर्चा केली असून मुंबई महापालिका, एमएमआरडीए ,पीडब्ल्यूडी यांची मदत घेऊन अशा प्रकारच्या सोयीसुविधा लवकरच पुरवण्यात येणार आहेत. आरेमध्ये पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांना विकासाच्या दृष्टिकोनाचा चांगलाच फायदा होईल


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha