Nashik Central Jail : समाजात शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षणामुळे माणूस सज्ञान बनतो. म्हणूनच अनेक कारागृहात देखील कैद्यांना शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग राबविला जातो. नाशिकमध्ये (Nashik) देखील हा अभिनव प्रयोग राबविण्यात येत असून नाशिकरोड कारागृहातील (Nashikroad Central Jail) कैद्यांचे अपूर्ण असलेले शिक्षण पूर्ण व्हावे, कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, कारागृहात स्थापन केलेल्या संगणक कक्षात सध्या 120 कैदी मुंबई आयआयटी यांनी तयार केलेल्या प्रोग्रामिंगचे शिक्षण घेत आहेत. 


शिक्षणाशिवाय पर्याय नाही, घरदार कुटुंब चालवायचं असल्यास, नोकरी करायची असल्यास शिक्षण घेणे महत्वाचे असते. म्हणूनच आज प्रत्येकजण शिक्षणाच्या मागे लागलेला दिसून येतो. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड कारागृहातील कैद्यांसाठी शिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षा संपल्यानंतर काहीतरी नोकरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु होईल. समाजात नवीन स्थान मिळेल. या उद्देशाने नाशिकरोड (NashikRoad Jail) कारागृहातील कैद्यांना शिक्षण दिले जात आहे. सद्यस्थितीत 109 जण डिग्री व डिप्लोमाचे शिक्षण (Degree Education) घेत आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा बंदी व न्यायाधीन असे जवळपास 3 हजार कैदी आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबईच्या (Mumbai) समता फाउंडेशनच्या मदतीने कैद्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र संगणक कक्षाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली आहे. या वर्षी 120 कैदी कारागृहात मुंबई आयआयटीने तयार केलेल्या प्रोग्रामिंगचे शिक्षण घेत आहेत. आयआयटीच्या प्रोग्राममध्ये वर्षभरात चार परीक्षा होणार आहेत. सध्या कारागृहात तीन बॅचमध्ये कैदी शिक्षण घेत आहेत. 


दरम्यान 2019 पासून पाचशेहून अधिक कैद्यांनी (Prisoner education) आयआयटीच्या प्रोग्रामचे शिक्षण पूर्ण केले आहे. समता फाउंडेशनकडून प्रशिक्षकांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मागील 7 वर्षांत दीड हजार कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले असून पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना शिक्षेमध्ये 90 दिवसांची माफी आहे. कारागृहात 2014  पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे (YCM) केंद्र सुरु असून आतापर्यंत 900 कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. तर 2016 पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाच्या अंतर्गत 600 कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय सटिफिकेट कोर्स इन फूड न्यूट्रीशियनसाठी आठ कैदी, सर्टिफिकेट इन ह्युमन  राईट्ससाठी 24 कैदी, सर्टिफिकेट इन रूरल डेव्हलपमेंट साठी 40 असे एकूण 86 कैदी इतर कोर्सेस करत आहेत.  विधी अभ्यासक्रम पात्रता (सीईटी) परीक्षेस बसण्यासाठी उपमहानिरीक्षकांनी पाच कैद्यांना परवानगी दिली आहे. तसेच कारागृहात पुरुष व महिला कैद्यांसाठी स्वतंत्र शिवण काम प्रशिक्षण केंद्र चालविले जात असून सध्या 65 कैदी लाभ घेत आहेत.


दोन विद्यापीठात 109 कैद्यांचे शिक्षण 


तसेच नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये अनेकांचे शिक्षण अपूर्ण आहे. यात डिग्री, डिप्लोमाचे शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा शिक्षणाची आवड असलेल्या कैद्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे डिग्री व डिप्लोमाचे शिक्षण दिले जाते. यासाठी 94 पुरुष व 15 महिला कैदी असे एकूण 109 जण शिक्षण घेत आहेत. तर सद्यस्थितीत या दोन्ही विद्यापीठातून 109 कैदी शिक्षण पूर्ण करत आहेत. यात  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एफवायबीएसाठी 14, एसवायबीए साठी 21, टीवायबीएसाठी नाव एफवायबीकॉमसाठी चार, योग शिक्षक पदविकेसाठी 26 असे 75 कैदी शिक्षण घेत आहेत. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मार्फत एफवायबीएसाठी दोन, टीवायबीएसाठी एक, टीवायबीकॉमसाठी 01, एमएसओसाठी सहा कायदे शिक्षण घेत आहेत.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI