Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड आणि  IDEMI, मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी आहे.  त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...


राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड


पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इन्चार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन.


एकूण जागा – 87


शैक्षणिक पात्रता – MBBS, MSW, B.Com, MD (सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022


अर्ज पाठवण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड


अधिकृत वेबसाईट - beed.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर बातम्या आणि अद्यतने यात राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध संवर्गाची रिक्त पदाची जाहिरात यावर क्लिक करा. पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


IDEMI, मुंबई (Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai)


पोस्ट – अप्रेंटिस (यात प्रोग्रामिंग & सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसाठी 10 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 3 जागा, इन्स्ट्र्मेट मेकॅनिक पदासाठी 3 जागा, फिटर पदासाठी 3 जागा, मशिनिस्टसाठी 3 जागा, मशिनिस्ट  (ग्राइंडर)साठी 3 जागा, टूल्स & डाई मेकिंगसाठी 2 जागा, मेकॅनिक मशीन टूल मेंटनेंस, IT & ESM, इलेक्ट्रिशियन, टर्नरसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)


एकूण जागा – 29


शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI


नोकरीचं ठिकाण – मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022


अधिकृत वेबसाईट - idemi.org (या वेबसाईटवर गेल्यावर notifications मध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI