Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाशचे  (Tejasswi Prakash)'रुला देती है' (Rula Deti Hai) हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण आणि तेजस्वी नुकतेच 'बिग बॉस 15' मध्ये दिसून आले होते. 'रुला देती है' हे गाणे यासर देसाईने गायले आहे. 


देसी म्युझिक फॅक्टरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. करण आणि तेजस्वीनेदेखील या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा 'बिग बॉस' नंतरचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. 'रुला देती है' या गाण्याचे शूटिंग गोव्यात झाले आहे.





'रुला देती है' हे गाणे करण-तेजस्वीच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. करणसोबत काम करण्याबाबत तेजस्वी प्रकाश म्हणाली,"करण आणि मी गेले अनेक दिवस एकमेकांसोबत काम करण्याच्या संधीची वाट पाहत होतो.  'रुला देती है' या गाण्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळाली".


संबंधित बातम्या 


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना


Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha