एक्स्प्लोर

JEE Main Result 2022 : जेईईमध्ये 14 विद्यार्थांचा 100 टक्के स्कोअर; कोणत्या राज्यात सर्वाधिक टॉपर्स?

JEE Mains Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 11 जुलै रोजी JEE (Mains) च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर केला. रांचीच्या कुशाग्र श्रीवास्तवने अव्वल कामगिरी केली.

JEE Mains Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई (मुख्य) च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर करण्यासोबत टॉपर्सची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, JEE Mains 2022 मध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. दरम्यान,  काल जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.

झारखंड (Jharkhand) रांची (Ranchi) मधील कुशाग्र श्रीवास्तव (Kushagra Srivastava) यानं IIT JEE Mains 2022 मध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या मते, JEE (Mains) - 2022 परीक्षेच्या दोन्ही सत्रांनंतर उमेदवारांची श्रेणी तयार केली जाते. 100 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हरियाणातील सार्थक माहेश्वरी, तेलंगणातील अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगणातील धीरज, आंध्र प्रदेशातील कोयन्ना सुहास, झारखंडमधील कुशाग्र श्रीवास्तव, पंजाबमधील मृणाल गर्ग, आसाममधील स्नेहा पारीक, राजस्थानमधील नव्या यांचा समावेश आहे. कुशाग्रने 100 टक्के गुण मिळवून राज्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा गौरव केला आहे. कुशाग्रच्या या यशावर कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत.

कुशाग्रला इतके गुण मिळाले

कुशाग्रने भौतिकशास्त्रात 99.94, रसायनशास्त्रात 100 आणि गणितात 99.9 गुण मिळवले आहेत. जेईई मेनमध्ये चांगले प्रदर्शन करणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी बसू शकतील. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये चांगली रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील आयआयटीसह देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळेल.

100 टक्के गुण मिळवणाऱ्या 14 विद्यार्थ्यांची नावं 

  1. जस्ति यशवंत वी वी एस, तेलंगाणा
  2. सार्थक माहेश्वरी, हरियाणा
  3. अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगाणा
  4. धीरज कुरुकुंडा, तेलंगाणा
  5. कोय्याना सुहास, आंध्रप्रदेश
  6. कुशाग्र श्रीवास्तव, झारखंड
  7. मृणाल गर्ग, पंजाब
  8. स्नेहा पारीक, असाम
  9. नव्या, राजस्थान
  10. पेनिकलपति रवि किशोर, आंध्रप्रदेश
  11. पोलीसेटी कार्तिकेय, आंध्रप्रदेश
  12. बोया हरेन सात्विक, कर्नाटक
  13. सौमित्र गर्ग, उत्तरप्रदेश
  14. रूपेश बियाणी, तेलंगाणा

जेईई मेनचा निकाल कसा तपासाल? (Check JEE Main Result 2022)

  • स्टेप 1 :  विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
  • स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवर JEE Main Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3 : यानंतर विद्यार्थ्याने आयडी आणि पासवर्ढ प्रविष्ट करावा.
  • स्टेप 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.
  • स्टेप 5 : विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.
  • स्टेप 6 : गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.  

जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा कधी?

जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

JEE Main Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget