एक्स्प्लोर

Handwriting Scam : हस्ताक्षर बदल प्रकरण! विषयाचा अनुभव नसतानाही पेपर तपासणीसाठी, उत्तरपत्रिकेत 10 ते 30 गुण वाढवून दिले

HSC Exam Handwriting Scam: दोन्ही संशयित आरोपींकडून एकूण 372 विद्यार्थ्यांना हस्ताक्षर बदलातून 10 ते 30 गुण वाढवून देण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

HSC Exam Handwriting Scam: बारावीचा (HSC) भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकाच्या हस्ताक्षर बदल प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भौतिकशास्त्र विषय शिकवण्याचा कोणताही अनुभव नसताना तो आपण शिकवत असल्याची खोटी माहिती यातील आरोपींकडून विभागीय शिक्षण मंडळाला देण्यात आली होती अशी माहिती आता समोर येत आहे. तर यातील महिला आरोपीला देखील फक्त एक वर्षांचा अनुभव होता, मात्र तिने आपल्याला दीर्घ अनुभव असल्याची खोटी माहिती शिक्षण मंडळाला दिली होती. तर या दोन्ही संशयित आरोपींकडून एकूण 372 विद्यार्थ्यांना हस्ताक्षर बदलातून 10 ते 30 गुण वाढवून देण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हे दोन्ही आरोपी सद्या फरार असल्याने या सर्व आरोपांवर स्पष्टता होऊ शकत नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी शिक्षक राहुल भगवानसिंग उसारे या शिक्षकाने विभागीय शिक्षण मंडळाला आपण भौतिकशास्त्र विषय शिकवत असल्याची खोटी माहिती दिली होती. तर यातील दुसऱ्या महिला आरोपी असलेल्या मनीषा भगवान शिंदे या शिक्षिकेलाही फक्त एक वर्षांचा भौतिकशास्त्र विषय शिकवण्याचा अनुभव होता. मात्र त्यांनी देखील आपल्याला दीर्घ अनुभव असल्याची खोटी माहिती शिक्षण मंडळाला दिली होती. धक्कादायक म्हणजे दोन्ही संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीची कोणतेही खात्री न शिक्षण मंडळाने त्यांना पेपर तपासणीसाठी दिले होते. 

विद्यार्थ्यांना 10 ते 30 गुण वाढवून देण्यात आले? 

हस्ताक्षर बदल प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी हस्ताक्षर बदल असलेले 372 उत्तरपत्रिका तपासासाठी मागवून घेतल्या आहेत. तर बदलेल्या हस्ताक्षरातून एकूण 372 विद्यार्थ्यांना 10 ते 30 गुण वाढवून देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निकाल जाहीर करताना 372 विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बदलनंतर वाढलेले गुण रद्द करून निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

उत्तरपत्रिका तपासणीसाठी मिळवण्यासाठी पत्रव्यवहार

पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासात या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच यात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ज्यात या दोन्ही संशयित आरोपींनी स्वतः या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्याला मिळाव्यात म्हणून मंडळाकडे पत्रव्यवहार केला होता. तर मंडळानेही कोणतीही चौकशी न करता त्यांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्याचं देखील समोर येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

HSC Exam Handwriting Scam: बारावी परीक्षा हस्ताक्षर बदल प्रकरणातील दोन्ही प्राध्यापकांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget