एक्स्प्लोर

HSC Exam Hall Ticket : मोठी बातमी! परीक्षा मंडळाचा 'जात प्रवर्ग'चा निर्णय रद्द, 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार!

HSC and SSC exam hall ticket : हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता नव्याने हॉल तिकीट दिले जाणार आहेत.

मुंबई : इयत्ता दहावी आणि इयत्ता बारीवीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर अशा प्रकारचे जात प्रवर्गाचा उल्लेख कशामुळे करण्यात आला? त्यामागचा उद्देश काय आहे? असे विचारण्यात येत होते. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत.

नेमका आक्षेप कशावर होता?

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा प्रश्न विचारण्यात येत होता. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जातीच्या प्रवर्गाचा उपयोग काय? असाही सवाल करण्यात येत होता. त्यावर शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी काय झाली आहे, पालक तसेच विद्यार्थ्यांना समजावे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्या येत होते. मात्र शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध झाल्यानंतर शेवटी शिक्षण मंडळाने दिलगीरी व्यक्त करून हा निर्णय मागे घेतला आहे. 

23 जानेवारी रोजी नवे हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल 

या विरोधानंतर शिक्षण मंडळाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच नव्याने हॉल तिकीट जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पासून हे नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 जानेवारी 2024 रोजीच्या दुपारी तीव वाजेपासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. 

मंडळाच्या परिपत्रकात नेमकं काय आहे? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुकवार दिनांक 10/01/2025 रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 

या संदर्भात कळविण्यात येते की, 1) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (Hall Ticket) गुरूवार दिनांक 23/01/2025 पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलव्ध करून देण्यात येत आहेत. 


2) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) हा कॉलम रद्द करण्यात येत असून सदरची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर सोमवार दिनाक 20/01/2025रोजी दुपारी 03.00 वाजेपासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच download संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील, यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी.

हेही वाचा :

SSC & HSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जात आणली; संतापाचा कडेलोट होताच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष काय म्हणाले?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget