Yavatmal Crime : मुख्याध्यापकाकडून केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, यवतमाळ जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
Yavatmal Crime : मुख्याध्यापकाकडून केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, यवतमाळ जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Yavatmal Crime : यवतमाळच्या (Yavatmal Crime) दिग्रस येथील शाळेत मुख्याध्यापकाने चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकाने (Yavatmal Crime) विकृत कृत्य केल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय. विशाल विजयकुमार कुळकर्णी (वय 43, रा. कृष्णभूमी, दिग्रस) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.
ऑफिसमध्ये बोलवून मुख्याध्यापकाचे अश्लील चाळे
अधिकची माहिती अशी की, केजीमध्ये शिकत असलेल्या चिमुकलीवर मुख्याध्यापकानेच अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. यवतमाळमधील एका शाळेत विद्यार्थीनी केजी 2 ला शिकते. मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा काही दिवसांपासून दररोजच लैंगिक छळ करत होता. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ऑफिसमध्ये बोलवून अश्लील चाळे करत होता. मुख्याध्यापकाच्या या वर्तणामुळे विद्यार्थीनी घाबरली होती. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पतीला याबाबतची माहिती दिली. मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
65 वर्षीय उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गुहागरमध्ये 65 वर्षाच्या उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. घटनेच्या आठ दिवसांनंतर पीडित मुलीच्या पालकांनी गुहागर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलीवर परचुरी गावातील उपसरपंचाकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दरम्यान, या घटनेनंतर उपसरपंचाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. गुहागर पोलीस स्थानकात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उपसरपंच अशोक भुवडवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिकमध्ये वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. नाशिकच्या पंचवटी परिसरात धक्कादायक घटना घडली होती. शेतात नेत महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचे नातेवाईक असल्याची पोलिसांनी माहिती पोलिसांनी दिली होती. जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
सैफ हल्ल्यातील आरोपीविरोधात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, मोहम्मद शहजादचा फेस रेकग्निशन अहवाल समोरhttps://t.co/HSd18jWxRG#SaifAliKhan #bollywood #entertainment #Crimenews #mumbai
— ABP माझा (@abpmajhatv) January 31, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
