Yavatmal Crime News:  यवतमाळच्या (Yavatmal) पुसद तालुक्यातील वसंतवाडी येथे एक धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. ऊस तोडीच्या पैशांच्या देवाण - घेवाणीवरुन एका महिलेच्या पतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी त्या महिलेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता चार ते पाच जणांनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. त्यानंतर त्या महिलेच्या पतीला घेऊन ते लोक पसार झाले. याप्रकणी त्या चार ते पाच जणांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमकं काय घडलं?


अनिता अनिता निरंजन राठोड वय वर्ष 37 असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. मृतक निरंजन राठोड हा मुकादम असून तो ऊसतोड मजूर उपलब्ध करुन देण्याचे काम करत होता. दरम्यान मराठवाड्यातील एका कारखानदाराने ऊस तोडीसाठी निरंजन राठोडला ऊस तोड मजूर पुरविण्याकरिता सांगितले होते. यासाठी त्या कारखानदाराने निरंजनला दोन वर्षांपूर्वी पाचे ते सहा लाख रुपये दिले असल्याची माहिती मिळत असल्याचं सांगितल आहे. परंतु निरंजन काही कारणास्तव मजूरांना पाठवू शकला नाही. त्यानंतर निरंजन याने घेतलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम कारखानदाराला परत देखील केली होती. 


त्यानंतर उर्वरित रक्कम परत देण्यासाठी निरंजन टाळाटाळ करत होता अशी माहिती खंडाळा पोलिसांनी दिली आहे. त्या कारखानदारांच्या चार ते पाच माणसांनी निरंजनचे घर गाठले. निरंजन आणि त्याची यवतमाळमधील पुसद तालुक्यातील वसंतवाडी या गावामध्ये राहत होते. हे चार ते पाच जण रात्री वसंतवाडी येथे पोहचले. पोहचल्यावर त्यांनी निरंजनला मारहणार करण्यास सुरुवात केली. हे लोक निरंजनला गाडीत घालून पसार होत असतानाच निरंजनची पत्नी त्यांच्या गाडीसमोर येऊन उभी राहिली. 


गाडी अडल्याने तिला गाडीने धक्का देण्यात आला. त्यानंतर तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यामुळे अनिता गंभीर जखमी झाली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. ते चार ते पाच जण   निरंजनला घेऊन  वाशिम मार्गे मेहकरकडे पसार झाले.तसेच या पसार झालेल्या लोकांना पकडण्यासाठी खंडाळा पोलिसांचे एक पथक तात्काळ रवाना झाल्याची माहिती  पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर यांनी दिली आहे.


या पसार झालेल्या लोकांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पण यामुळे यवतमाळमधील पुसदमध्ये एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस यासंदर्भात पुढील कारवाई काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :


Chhatrapati Sambhaji Nagar : शेतीच्या वादातून वाद झाला, लहान भावाने केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा घात झाला