Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : वादातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या वादातून गंभीर घटना घडतांना गेल्या काही दिवसांत अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे. अशीच काही घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांच्यात तीन दिवसांपूर्वी वाद झाला. या वादात लहान भावाने मोठ्या भावाचे गुप्तांग दाबले आणि उचलून पटकले. यामुळे मोठा भाऊ बेशुद्ध झाला होता. मात्र त्याच्या उपचारदरम्यान मुत्यू झाल्याने लहान भावासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव गहेनाजी साखळे (वय 70 वर्षे) असे मयत झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर लहान भाऊ भगवान गहेनाजी साखळे, विशाल भगवान साखळे, आकाश भगवान साखळे, सुभद्राबाई भगवानसाखळे (सर्व राहणार लिहाखेडी) यांच्याविरुद्ध अजिंठा ठण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील गट क्रमांक 277 आणि 278 येथे बुधवारी (5 जुलै) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मयत बाबूराव आणि त्यांचा भाऊ भगवान यांचे शेतीच्या वादातून भांडण सुरू झाले. यावेळी भगवान याने मयत बाबुराव याचे गुप्तांग दाबून उचलून पटकले. यात आरोपीचे मुले विशाल, आकाश आणि पत्नी सुभद्राबाईने मयताच्या पोटात, अंगावर लाथा बुक्याने मारहाण केली. यानंतर बेशुद्धावस्थेत बाबुराव यांना त्यांच्या धाकटा भाऊ राजाराम साखळे याने उपचारासाठी सिल्लोड येथे दाखल करून, पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी (7 जुलै) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास बाबुराव यांची प्राणज्योत मावळली.
त्यामुळे याप्रकरणी मयताचा धाकटा भाऊ राजाराम साखळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी लहान भाऊ भगवान गहेनाजी साखळे, विशाल भगवान साखळे, आकाश भगवान साखळे, सुभद्राबाई भगवानसाखळे (सर्व राहणार लिहाखेडी) यांच्याविरुद्ध अजिंठा ठण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद भिंगारे यांच्या पथकांने यातील तिघांना अटक केली आहे. तर यातील महिला आरोपी फरार झाल्या आहेत.
मयत भावावरही गुन्हा ...
याच भांडणात आरोपी भगवान साखळे याने बुधवारी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयत बाबुराव गहेनाजी साखळे, राजू गहेनाजी साखळे, अतुल राजाराम साखळे, ताराबाई बाबुराव साखळे यांच्याविरुध्द ही शिवीगाळ करणे, जबर मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :