कोल्हापूर : उतारा सांगण्यासाठी आली अन् घरातील सोन्यावर डल्ला मारून गेली; आता दागिन्यांसाठी पोलिसांचा 'उतारा' शोधण्याची वेळ आली!
मांत्रिक महिलेने लोखंडी तिजोरीच्या चाव्या घेत तिजोरीतील 13 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, एका डोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या पट्टीतील मंगळसूत्र आणि रोग सहा हजार 800 रुपये असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल लुटून नेला.
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे उतारा टाकण्यासाठी आलेल्या मांत्रिक महिलेने पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली. दागिन्यांसह रोख रक्कम असा चार लाखांचा मुद्देमाल घरातून लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात मांत्रिक रेश्मा शेख (रा. कुडची ता. रायबाग जि.बेळगाव) हिच्या विरोधात मिरासो मकबूल बागसार (रा. निमशिरगाव) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार निमशिरगावात मिरासो बागसारांच्या घरी उतारा टाकण्यासाठी मांत्रिक रेश्मा ही रविवारी रात्री आली होती. यावेळी रेश्माने उतारा तयारू दिला आणि मिरासो बागसारांना तो टाकण्यासाठी बाहेर पाठवून दिले.
याच मुदतीत घरी कोणी नसल्याचे पाहून लोखंडी तिजोरीच्या चाव्या घेत तिजोरीतील 13 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, एका डोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या पट्टीतील मंगळसूत्र व रोग सहा हजार 800 रुपये असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. उतारा टाकून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
डिकीतून दीड लाख चोरणाऱ्याला अटक
दुसरीकडे, कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील मंगळ मंगळवार पेठेतील सनगर गल्लीत रस्त्यावर उभा केलेल्या दुचाकीच्या डिकीतून एका शिक्षकाचे एक लाख रुपये लंपास करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. मधु जाला (वय 25, रा. जिल्हा निल्लोर, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक प्रदीप घाटगे यांनी 24 एप्रिलला जनता बँकेतून रोख एक लाख रुपये काढले होते. दुचाकीच्या डिकीत पैसे ठेवून ते घरी चालले असताना दुपारच्या सुमारास दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून महाईसेवा केंद्रात माहिती घेण्यासाठी गेले असताना अवघ्या पाच मिनिटात पैशावर डल्ला मारला होता. त्याचा तपास जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू असतानाच अन्य एका चोरीत सांगली पोलिसांनी मधुला अटक केली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोल्हापुरातील चोरीची कबुली दिली. सांगली पोलिसांना त्याचा ताबा जुना राजवाडा पोलिसांना दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या