एक्स्प्लोर

Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर

Vasai Crime News: मयत अशोक सिंह राजपूत आणि आरोपी दिनेशकुमार प्रजापती या दोघांनी मिळून संसार उभा करण्यासाठी वसईच्या जाबरपाडा येथे किराणा मालाचा छोटा व्यवसाय सुरू केला होता.

वसई: वसईत उघडकीस आलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाच्या (Vasai Crime News) प्रकरणाने केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर मानवी नात्यांमधील भीषणता समोर आणली आहे. ज्या मित्रावर विश्वास ठेवून मयत व्यक्तीने छोटंसं दुकान पार्टनरशिपमध्ये सुरू केलं, त्याच मित्राने पैशांच्या वादातून त्याचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.(Vasai Crime News)

सोमवारी सकाळी ९च्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळच पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंब्याच्या वाडीत एका गोणीत शिर नसलेल्या इसमाचा गोणीत मृतदेह (Vasai Crime News) मिळाला होता. पोलिसांसमोर अनोळखी व्यक्तीचा नाव ओळखने मोठं जिकरीच होतं. हातावरील एका नावाच्या टॅटूवरुन ओळख झाली. घटनास्थळाचा पंचनामा आणि श्वान पथकाच्या मदतीनं रॅपीड आठ तासाच्या तपासात आरोपी मिळून सापडला आणि मयताच धड ही मिळालं. (Vasai Crime News)

खाणिवडे खाडीत त्याने धड टाकलं होतं. तपासात हत्येचं कारण निष्पण झालं ते हादरवणार आणि विचार करायला लावणार होतं. मयत अशोक सिंह राजपूत आणि आरोपी दिनेशकुमार प्रजापती या  दोघांनी मिळून संसार उभा करण्यासाठी वसईच्या जाबरपाडा येथे किराणा मालाचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, हाच व्यवसाय वादाचे कारण ठरला. पैशांच्या देवाण घेवाणीवरून निर्माण झालेला तणाव इतका टोकाला गेला की,आरोपीने थेट मित्राचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे, तर ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे शीर वेगळं करण्याइतकी अमानुष क्रूरता त्याने दाखवली आणि एका क्षणात विश्वास, मैत्री आणि माणुसकी यांचा अंत झाल्याचे चित्र या घटनेतून दिसून येते. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिनेशकुमार प्रजापती आणि त्याला साथ देणारा संदिप तिवारी या दोघांना अटक केली आहे. वसई न्यायालयाने दोघा आरोपीना १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Vasai Crime News)

नेमकं काय घडलं ?

या थरारक घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी आसपास फिरलेल्या संशयित वाहनांची माहिती गोळा केली. त्याआधारे दिनेशकुमार प्रजापती याला जाबरपाडा येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार संदीप तिवारी याच्या मदतीने मित्र अशोक सिंग राजपूत (वय ३२, मूळ रा. राजस्थान) याची हत्या केल्याची कबुली दिली.

तपासात समोरं आलं, अशोक सिंग व आरोपी दिनेशकुमार यांच्यात किराणा व्यवसायात भागीदारी होती. आर्थिक वादातून दोघांनी मिळून अशोक सिंगचा धारदार हत्याराने खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याचे शिर धडापासून वेगळे करून मृतदेह झाडाझुडपात फेकण्यात आला, तर शिर खाडी परिसरात टाकण्यात आले. पोलिसांनी तत्काळ ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवून नदीकाठाजवळील झाडाझुडपात मृताचे शिर, मोबाईल फोन व इतर पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget