Pune News : वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या? हे व्हिसेरा रिपोर्ट ठरवणार; रिपोर्टसाठी बावधन पोलिसांचा फॉरेन्सिक सायन्सच्या तज्ञांना पुन्हा रिमाईंडर!
वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या, हे व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून आहे.त्यामुळं बावधन पोलिसांना हा रिपोर्ट लवकर मिळावा, यासाठी तपासन करणाऱ्या संस्थेला रिमाईंडर ही देण्यात आलाय.

Vaishnavi Hagawane Death Case पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या, हे व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून आहे. त्यामुळं बावधन पोलिसांना हा रिपोर्ट लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक सायन्सचे तज्ञ आणि रासायनिक तपासन करणाऱ्या संस्थेला रिमाईंडर ही देण्यात आलाय. मात्र अद्याप हा व्हिसेरा रिपोर्ट आलेला नाही. तो कधी येणार? याकडे कस्पटे कुटुंबियांसह अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. बावधन पोलीस संबंधित संस्थेला पुन्हा एकदा रिमाईंड देण्याची शक्यता आहे.
जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली
दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नाव समोर आलेले पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी गृहरक्षक दलातील उपमहासमादेशक म्हणून पदभार स्वीकारलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर गृहविभागाने त्याची तडकाफडकी बदली केली होती. बदली करताना सुपेकर यांचे हे पदावनत करण्यात आले आहे. त्यात जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.
दरम्यान, हगवणे कुटुंबीय आपले दूरचे नातेवाईक असून या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा सुपेकर यांनी केला होता. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागल्याने गृहविभागाने गुरुवारी सुपेकर यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर व नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे.
जेसीबी विक्रीमध्ये 11.70 लाखांची फसवणूक
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी शशांक आणि त्याची आई लता हगवणेनं जेसीबी विक्रीच्या नावाखाली प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. प्रशांत यळवंडेनं जेसीबी विक्रीसाठी अॅडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले तब्बल 11 लाख 70 हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट पिस्तूलाचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोस, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
























