Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Death Case) आरोपी सासरा राजेंद्र हागवणे (Rajendra Hagawane), दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणे आणि सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी कोर्टात केलं होतं. आज या तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे न्यायालयात यावर सुनावणी झाली. पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्याकारणाने आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. यावर आरोपी सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
कोर्टात काय काय घडलं?
सरकारी वकिलांनी कोणती बाजू मांडली?
निलेश चव्हाण याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
हगवणे कुटुंबीयांचे 2 मोबाईल निलेश कडे आहे.
निलेश आणि हगवणे कुंबिय यांच्यात चॅटिंग झालं आहे.
निलेश आणि हगवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत
पाच दिवसांची कोठडी निलेश याला देण्यात यावी अशी मागणी.
वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडे होते त्याने त्या बाळाची हेळसांड केली का याचा तपास करायचा आहे.
निलेश चव्हाणचे वकील काय म्हणाले?
निलेशची सगळी चौकशी पूर्ण झाली आहे.
एक ही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही.
यामुळे नीलेश याला न्यायालयीन कोठडी झाली पाहिजे.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवीला होत असलेला सासरकडचा त्रास, मारहाण यामुळे वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं, मात्र ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असा संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता सर्वच दृष्टीकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन 71 किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे. हा घरातील पंखा वैष्णवीचं 71 किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी साडी, पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. या शिवाय नीलेश चव्हाणच्या ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. नीलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला. मात्र, तो माझा नाहीच, असे नीलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर लॅपटॉमध्ये काय आहे याचा उलगडा होणार आहे.