RCB vs PBKS IPL Final 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल 2025 चा विजेतेपदाचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्ससोबत (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर आयपीएलचा हा अंतिम सामना खेळवण्यात येईल. मात्र या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज फिल सॉल्ट (Phil Salt) आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुकण्याची शक्यता आहे. फिल सॉल्ट विराट कोहलीसोबत सलामीवीर म्हणून मैदानात उतरतो. फिल सॉल्ट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात फिल सॉल्टने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते.

फिल सॉल्ट सराव सत्रात गैहजर-

मिळालेल्या माहितीनुसार, फिल सॉल्टची पत्नी लवकरच आई होणार आहे. फिल सॉल्ट कदाचित त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी घरी परतला असेल. आरसीबीने अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव केला. या सराव सत्रात फिल सॉल्ट कुठेही दिसला नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, फिल सॉल्टबाबत आरसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

आक्रमक फलंदाज म्हणून फिल सॉल्टची ओळख-

फिल सॉल्टने या हंगामात आरसीबीसाठी 12 सामन्यांमध्ये 175.90 च्या स्ट्राईक-रेट आणि 35.18 च्या सरासरीने 387 धावा केल्या आहेत. फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर आक्रमक होऊन फलंदाजी करतो. फिल सॉल्टने पहिल्या क्वालिफायरमध्ये त्याने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक ठोकले. यामुळे आरसीबीने हा सामना सहज जिंकला. जर आज फिल सॉल्ट अंतिम सामना न खेळल्यास आरसीबीसह विराट कोहलीवर देखील दबाव येऊ शकतो. 

अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल?

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणार आहे. क्वालिफायर-2 मध्येही या मैदानावर खूप धावा झाल्या. मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या ज्या पंजाब किंग्स सहजरित्या केल्या. आयपीएल 2025 च्या हंगामात या मैदानावर एकूण आठ सामने खेळले गेले आहेत ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 6 सामने जिंकले आहेत.

संबंधित बातमी:

IPL 2025 Final Prize Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस; मुंबई-गुजरातनेही कोट्यवधी कमावले, पाहा A टू Z माहिती

RCB vs PBKS IPL 2025 Final: पंजाबविरुद्ध बंगळुरुच्या अंतिम सामन्यातही पाऊस कोसळणार; पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॉफी मिळणार?; BCCI चा नियम जाहीर