Crime News : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातील महिलांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनसीबीच्या मुंबई (NCB Mumbai) आणि दिल्ली युनिटने कारवाई करत दोन इथोपियन नागरिक आणि भारतातील एका महिलेला अटक केली होती. अटक केल्याच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आफ्रिकन नागरिक उत्तर भारतातील महिलांना टार्गेट करून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यानंतर त्यांचा अंमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी वापर करुन घेत असल्याचं उघड झालं आहे. आफ्रिका खंडातील अंमली पदार्थाच्या तस्करांना भारतात ड्रग्स हब्स बनवायचं असल्याचंही समोर आलं आहे. तसेच, भारतीय सागरी सीमेचाही वापर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचंही उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिकन नागरिक भारतीय महिलांशी विवाह करून त्यांचा वापर तस्करीसाठी करतात. भारतातील पाण्याचा वापर अंमली पदार्थांसाठी होत असल्याचं उघड झालं आहे. तसेच, अफगाणिस्तान,म्यानमारमध्ये आढळणारं ड्रग्ज देखील भारतातून आणलं जात असल्याचाही खुलासा चौकशीअंती झाला आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान, दोन इथोपियन नागरिक आणि एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 5 किलोंचं कोकेन जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत 50 कोटी एवढी आहे.
प्रकरण नेमकं काय?
काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या मुंबई (NCB Mumbai) आणि दिल्ली युनिटनं कारवाई करत दोन इथोपियन नागरिक आणि भारतातील एका महिलेला अटक केली होती. अटक केल्याच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याकडून 5 किलोंचं कोकेन जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत 50 कोटी एवढी आहे. हे तिनही आरोपी मुंबई आणि दिल्लीतून नेटवर्क चालवत होते. यासंदर्भात मुंबई एनसीबीला माहिती मिळाली. त्याआधारे अनसीबीनं महिलेला अटक केली. या चौकशीत ड्रग तस्करीसाठी भारतीय महिलांचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. एवढंच नाहीतर, आफ्रिकन नागरिक रेकी करुन उत्तर भारतातील महिलांना टार्गेट करतात. त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यानंतर त्यांचा वापर तस्करीसाठी करतात, ही धक्कादायक बाबही समोर आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Crime: दाढीला हात लावला म्हणून थेट जीवच घेतला, किरकोळ कारणावरून मित्राने-मित्राला कायमचं संपवलं