Asian Sport Climbing Championships: आशियाई गिर्यारोहण स्पर्धेत हिजाबला विरोध दर्शवणाऱ्या इराणची अॅथलीट एल्नाझ रेकाबी (Elnaz Rekabi) आज पहाटे मायदेशी परतल्यानंतर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आशियाई गिर्यारोहण स्पर्धेतील अंतिम सामन्यात एल्नाझ रेकाबीनं हिजाब न घालता भाग घेत इराणच्या राजवटीविरुद्ध उघड विरोध दर्शवला. मात्र, त्यानंतर तिच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, या भितीनं ती बुधवारी पहाटे तेहरानला परतली. जिथे नागरिकांनी मोठ्या संख्येत तिचं जल्लोषात स्वागत केलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


व्हिडिओ- 






 


इराणमधील लोक जवळपास महिनाभरापासून हिजाबच्या विरोधात आंदोलन करत आहेत. इराणमधील लाखो महिला रस्त्यावर उतरून हिजाबविरुद्ध आवाज उठवत आहेत. यासंबंधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सेऊल येथे खेळल्या गेलेल्या आशियाई गिर्यारोहण स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अॅथलीट एल्नाझ रेकाबीनं हिजाब न घालता स्पर्धेत भाग घेतला. हे पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले.


ट्वीट-






 


इराणचा नियम काय आहे?
इराणच्या नियमांनुसार कोणतीही महिला खेळाडू हिजाब परिधान केल्याशिवाय कोणत्याही खेळाच्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. मात्र, इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांच्या समर्थनार्थ एल्नाझ रेकाबीनं हिजाब न घालता स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अनिवार्य हिजाब नियमांचे पालन न करणारी दुसरी महिला ऍथलीट आहे.


हे देखील वाचा-