Hemp Online Selling : ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशननं हॉटेल आणि रेस्टारंटच्या जगात भलतीच क्रांती आणली आहे. आत्तापर्यंत जेवण ऑनलाईन मागवता येत होतं. मात्र आता गांजा (Hemp) देखील ऑनलाईन मागवता येणार आहे. कॅनडातीगांजाचा काळाबाजार रोखण्यासाठी एका ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीने हा निर्णय घेतलाय. यात गांजापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश असणार आहे.. त्यामुळे चॉकलेट, कँडीज अशा पदार्थांची विक्री होईल. अशा प्रकारे सुरक्षित विक्री करून या कंपनीला गांजाची अवैध विक्री थांबवायची आहे.मात्र हे पदार्थ मागवताना कंपनीने ग्राहकांच्या वयाची अट ठेवलीय. वास्तविक पाहाता अमेरिकेतील 19 राज्यांमध्ये गांजाचं सेवन अधिकृत करण्यात आलं आहे.  


ऑनलाइन ऑर्डर करताना, मेनूमध्ये चॉकलेट आणि कँडीज सारख्या अनेक गांजाच्या उत्पादनांचा समावेश असेल. ऑनलाईन वितरण कंपनी म्हणते की, ती गांजा मिळविण्यासाठी 'सुरक्षित आणि सोयीस्कर' मार्ग देईल ज्यामुळे काळा बाजार दूर होईल. अनेक लोक त्याचे समर्थन करत आहेत, तर काही गांजाच्या वापराच्या विरोधात आहेत. संशोधकांनी चेतावणी दिली की गांजाचा वारंवार वापर तरुणांमध्ये मेंदूच्या विकासास बाधित करू शकतो.


यूएस मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नाही


गांजाच्या व्यसनामुळे नैराश्य किंवा करिअर आणि नातेसंबंधातील समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. डेलीमेलशी बोलताना कंपनीनं सांगितलं की, "यूएस मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही, 19 राज्यांमध्ये त्यांचा वापर कायदेशीर करण्यात आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 48.2 दशलक्षाहून अधिक अमेरिकन दरवर्षी गांजाचं सेवन करतात. हा आकडा तरुण प्रौढांमध्ये वाढला आहे. कारण 19 राज्यांनी गांजाचा वापर करणं कायदेशीर असल्याचं जाहीर केलं आहे. 


स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम 


मारिजुआना हा एक अंमली पदार्थ आहे. ज्याचं सेवन धूम्रपानाच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरुपात केलं जातं. त्याचं जास्त सेवनं केल्यानं मेंदूच्या विकासावर परिणाम होतो, तसेच स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्या देखील उद्भवतात. कॅनडामध्ये डिलिव्हरी घेण्यासाठी, सर्व ग्राहकांनी त्यांचा आयडी दाखवणं आवश्यक आहे. ज्यात त्यांचं वय किमान 19 वर्ष असणं आवश्यक आहे.