माता न तू वैरिणी! अनैतिक संबंधातून पोटच्या गोळ्याचा प्रियकराच्या मदतीने खून, जळगावात एकाच दिवशी दोन हत्येच्या घटना समोर
जळगावात एकाच दिवशी दोन हत्येचा घटना समोर आल्या असून यातील एका घटनेत एका महिलेने तिच्या 14 वर्षीय मुलाचा खून केला आहे.

जळगाव : शहरात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका घटनेत तर आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याचा प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदनातून त्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे.
पहिल्या घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चौदा वर्षीय मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. मध्य प्रदेशातील जंगलात गळफास देऊन हा खून केल्याचे समोर आले आहे. 16 जानेवारीपासून हा मुलगा बेपत्ता होता. ज्यानंतर पोलिसांच्या तपास केला असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांनी मृत मुलाच्या आई आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेत जळगावातील बेपत्ता असलेल्या तरूणाचा ममुराबाद रोडवर मृतदेह आढळला आहे. कुटुंबियांनी त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. ज्यानंतर शवविच्छेदनातही गुदमरल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास देखील सुरु केली आहे. आतापर्यंत पहिल्या घटने मृत मुलाच्या आईसह प्रियकराला अटक करण्यात आली. दुसऱ्या गुन्ह्यातही दोन संशयित मारेकऱ्यांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा-
- बीडच्या पालीमध्ये स्मशानात चालू असलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस, महिला शेतकरी पाटबंधारे विभागाविरुद्ध आक्रमक
- धक्कादायक! मेट्रोमोनी साईटवरून तब्बल 255 पेक्षा अधिक तरूणींना गंडा; दीड कोटींपेक्षा जास्त रक्कम लाटली
- भाईंदरच्या खाडी पूलात तरुण-तरुणीने मारली उडी, तरुण वाचला तर तरुणीचा शोध सुरु
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा























