एक्स्प्लोर

Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा

Trupti Desai On Ashok Kharat Case : अशोक खरातच्या फार्म हाऊसवर 31 काडतुसे आणि पाच पुंगळ्या सापडल्या असून त्या कुठे फायर करण्यात आल्या आहेत याचा तपास सुरू आहे.

नाशिक : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खाडे प्रकरणी आता वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. अशोक खरातला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक कोर्टाच्या परिसरात चांगलाच राडा झाल्याचं दिसून आलं. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या आणि अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याला कानाखाली वाजवतो अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळी, हे प्रकरण गेल्या वर्षीच बाहेर आलं असतं, पण पोलिसांनी सगळे पेन ड्राईव्ह गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

अशोक खरातला मंगळवारी नाशिक कोर्टात दाखल करण्यात आलं. त्यावेळी नाशिक कोर्टाच्या परिसरात चांगलीच गर्दी झाल्याचं दिसून आलं. याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या कोर्टाच्या परिसरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या भोवती कडे करून त्यांना रोखून धरलं.

अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या

तृप्ती देसाई यांनी अशोक खरातला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. अशोक खरातने जे काही कृत्य केलं आहे त्यावर त्याच्यावर कारवाई होईलच. पण राज्यातल्या अनेक महिलांची मागणी आहे की अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याच्या कानाखाली वाजवू द्या, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. 

अशोक खरातला जर गेल्या वर्षीच पकडलं असतं तर अनेक महिला या वाचल्या असत्या. पोलिसांनी अशोक खरातचे पेन ड्राईव्ह गायब केले नसते, तर अशोक खरातचे कृत्य मागच्याच वर्षीच समोर आले असते असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये खरातचे पेन ड्राईव्ह आमच्याकडे येणार होते. पण आम्हाला जे पेन ड्राईव्ह देणार होते त्यांच्यावरच पोलिसांनी गु्न्हे दाखल केले. हे सगळं खरातला वाचवायला केलं गेलं असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला. 

भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक कोर्टात काळा बुरखा घालून कोर्टात आणण्यात आलं. अशोक खरात महिलांना पेढे खायला द्यायचा, त्यानंतर पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर त्या महिलांना मळमळ सुरू व्हायची अशी माहिती कोर्टातील युक्तिवादातून समोर आली आहे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवरून 31 काडतुसे आणि पाच पुंगळ्याही सापडल्या आहेत. याचा वापर कुठे करण्यात आला, हरणांची शिकार झाली का? या गोष्टींचा तपास सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. तसेच अशोक खरातने नरबळी दिले असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Amravati: धक्कादायक! भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहाचे लचकेतोड; अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या पोस्टमार्टम कक्षाबाहेरील खळबळजनक प्रकार; रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहाचे लचकेतोड; अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या पोस्टमार्टम कक्षाबाहेरील खळबळजनक प्रकार; रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Embed widget