एक्स्प्लोर

Sonam Raghuwanshi : नोकरावर प्रेम, नवऱ्याचा गेम! लग्न, हनीमून आणि हत्या, लग्नाच्या 13 दिवसातच सोनम राजाच्या जीवावर उठली

Sonam raghuwanshi News : लग्न झाल्यानंतर सोनमने तिच्या नवऱ्याला मेघालयला हनीमूनसाठी नेलं अन् त्याच ठिकाणी त्याची हत्या केली. ही हत्या जुन्या प्रेमप्रकरणातून केली असल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे गूढ आता हळूहळू उलगडत आहे. राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमनेच केल्याचं स्पष्ट झालं. या हत्येनंतर सोनम मेघालयातून गाजीपूरला पळून गेली आणि दबावाखाली आत्मसमर्पण केले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हनीमूनला गेलेला राजा बेपत्ता झाला आणि त्यानंतर पाच दिवसात त्याचा मृतदेहच हाती आला. पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशावह नावाच्या बॉयफ्रेंडसाठी सोनमने तिच्या पतीच्या काटा काढला, तोही लग्न झाल्यानंतर अवघ्या 13 दिवसात. या प्रकरणाची टाईमलाईन कशी आहे ते पाहुयात, 

तारीख- 10 मे 2025 

राजा रघुवंशींचा सोनमसोबत विवाह झाला. त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या नव्या आयुष्याची सुरुवात त्यांनी केली खरी, पण हाच नवा प्रवास राजा रघुवंशीसाठी आयुष्याचा शेवट करणारा प्रवास ठरला.

तारीख- 20 मे 2025 

दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला जायचे प्लॅनिंग सोनमने केलं होतं. 

तारीख- 23 मे 2025 

राजा आणि सोनमने मेघालयातील अनेक ठिकाणं पाहिली. सुरुवातीला दोघेही कुटुंबाच्या संपर्कात होते. या कपलने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. या हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले.

खरं तर राजाच्या हत्येचा कट त्याची पत्नी सोनमने आधीच शिजवला होता. हनीमूनला जाण्याची तिकीटं सोनमने बुक केली होती. राजा रघुवंशीचे भाऊ त्याल म्हणाले होते, आता नको नंतर जाऊ. तरीही सोनमने तिकीट बुक केल्यामुळे दोघं हनीमूनला गेले. ठरल्याप्रमाणे सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या केली आणि सोनम बेपत्ता झाली

तारीख- 2 जून 2025 

मेघालयच्या एका धबधब्याजवळ राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या हातावरचा टॅटू आणि हातातल्या स्मार्टवॉचमुळे त्याची ओळख पटली. 

तारीख- 8 जून 2025 

मेघालयमधून बेपत्ता झालेली सोनम थेट उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एका ढाब्यावर दिसली.  वेळ होती जवळपास मध्यरात्री 1 वाजताची. सोनम गाजीपुरमधील एका ढाब्यावर घाबरलेल्या अवस्थेत पहायला मिळाली. आपल्या नवऱ्याची काही गुंडांनी हत्या केली असून माझं अपहरण करुन मला गाजीपूरमध्ये आणून सोडल्याची बतावणी तिने हॉटेल मालकाला केली. घरी एक फोन करायचा आहे असं सांगून हॉटेल मालकाच्या मोबाईलवरुन तिने फोनही केला. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तिथून सोनमला ताब्यात घेतलं.

पोलिसी खाक्या दाखवताच सोनमने आपला गुन्हा मान्य केला. आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं सोनमने कबूल केलं. 

Raja Raghuwanshi Murder Case : नोकरावर प्रेम, नवऱ्याचा गेम

  • राज कुशवाह नावाच्या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते. 
  • राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात कामाला होता.
  • सोनम अकाउंट्स आणि स्टाफ मॅनेजमेंटशी संबंधित कामासाठी ऑफिसला यायची.
  • याच काळात राज कुशवाह आणि सोनम यांच्यात जवळीक वाढली. 
  • सोनमच्या लग्नानंतरही राजसोबत तिचे प्रेमसंबंध कायम होते.
  • प्रेमासाठी सोनमकडून पतीची हत्या करण्यात आली.

दुसरीकडे सोनमच्या कुटुंबाने आपली मुलगी निर्दोष असल्याचा दावा केला. या प्रकरणी मेघालय पोलिस खोटं बोलत असू आपल्या मुलीला अडकवलं जात असल्याचा आरोप सोनमच्या वडिलांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

लग्नाला महिनाही झाला नव्हता. तोवर या नात्याचा हा असा भयानक शेवट झाला. राजाची 'सोनम' बेवफा निघाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget