Solapur Crime News : लहान मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचं प्रकरण सोलापुरातून समोर आले आहे. रेस्कू पथकाने 9 मुलांची सुटका केली आहे. गड्डा यात्रेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. मुलाच्या अंगाला रंग लावून भीक मागायला लावलं जात असल्याचं व्हिडओतून समोर आले होते. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोलापुरात खळबळ माजली होती. त्यानंतर प्रशासनाने त्या मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काल मोहिम सुरु केली. तो मुलगा प्रशासनाला मिळाला नाही, पण इतर 9 मुलांना सोडवलं आहे. त्या नऊ मुलांना जबरदस्तीने काम लावले जातं होते तर काही मुलं भीक मागण्यासाठी लावले जातं होते. या नऊ मुलांना बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलेय. व्हायरल व्हिडीओतील मुलाचा शोध अद्याप सुरुच आहे. 


नेमकं काय झालं होतं ?


सोलापुरातील गड्डा यात्रेतील एक व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये चिमुकल्यामुलांच्या अंगाला केमिकलयुक्त रंग लावून त्याना भीक मागण्यासाठी गर्दीत उभं करण्यात आल्याचे दिसतंय. सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर सोलापुरातील बाल संरक्षण विभागाने याची दखल घेतलीय. बाल संरक्षण अधिकारी, पोलीस विभाग, सामाजिक संस्था या सर्वांच्या उपस्थितीत विविध पथक तयार करून गड्डा यात्रेत रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली. तेव्हा व्हिडीओत दिसणारे लहान मुले यात्रेत आढळून आले नाहीत, मात्र यात्रेत 9 लहान मुलं आढळून आली. या लहान मुलांना जबरदस्तीने काम लावले जातं होते तर काही मुलं भीक मागण्यासाठी लावले जातं होते. रेस्क्यू टीमने या लहान मुलांना ताब्यात घेत बाल कल्याण समितीसमोर हजर केले असता समितीने बाल सुधार गृहात त्यांची रवानगी केलीय. दरम्यान व्हिडीओत दिसलेल्या मुलांचा शोध हा सुरूच आहे. तसेच यात्रा संपेपर्यंत अशाच पद्धतीने रेक्यू कारवाई सुरु राहिलं अशी माहिती बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी दिली.


अतुल वाघमारे यांनी काय माहिती दिली ? 


 23 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आम्ही यात्रेत आणि यात्रेच्या परिसरात व्हायरल व्हिडीओतील मुलगा आहे का? याची पाहणी केली. त्यावेळी सदर बालकं आढळून आली नाहीत. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांचा शोध घेण्यासाठी निघालो. चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पीआय शिरसागर यांच्यासोबत चर्चा करून आमची चाईल्ड लाईनची सर्व टीम सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.  ऑपरेशन राबवत असताना जी व्हिडिओमध्ये व्हायरल झालेली जी मुलं आढळली नाही. परंतु त्या मुलांचा शोध घेत असताना इतर काही बालके सापडली. जी आई-वडिलांशिवाय होती.  त्यांना आम्ही रेस्क्यू केले, असे अतुल वाघमारे यांनी सांगितलं. 


बिहार अन् उत्तर प्रदेशमधील मुलं - 


एकूण नऊ बालकापैकी महाराष्ट्रातली चार बालक आहेत. बिहारमधली तीन  आणि उत्तर प्रदेशमधली दोन बालकं आहेत. या नऊ बालकाला आम्ही रेस्क्यू केला. रेस्क्यू करून नंतर बालकल्याण समितीसमोर सादर केलं. बालकल्याण समितीने त्या नऊ बालकांना सुधारगृहात पाठवलं.  जोपर्यंत सिद्धेश्वर यात्रा संपत नाहीये तोपार्यंत वेगवेगळ्या वेळामध्ये रेस्कू ऑपरशन राबवलं जाणार आहे, असे अतुल वाघमारे यांनी सांगितलं. 


आणखी वाचा : 


Crime : मारहाण केली, विष पाजलं, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली


दुबईतून नवऱ्याकडून सुपारी, भारतात चुलतभावाने विडा उचलला, वहिनीवर आधी अत्याचार मग जीव घेतला!


Pune Crime News : चिकनशॉप चालकाचा राडा, डोकं फिरलं अन् थेट पोलीस, नागरिकांवर कोयत्यानं केला हल्ला; पुण्यातील नऱ्हे परिसरात गोंधळाचं वातावरण


Kalyan Murder news : दारू पार्टी बेतली जिवावर! किरकोळ वादातून केला मित्राचा खून, हत्येनंतर स्वत:च पोलिसांना केला फोन आणि...