Beed Crime News Update : बीड जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्याला मारहाण (Marathi Crime News) करुन विष पाजल्याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल (इघई)करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Bombay High Court Aurangabad bench ) दिले आहेत. तीन महिन्यानंतर सहा विद्यार्थ्यांवर हुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. पोलिसांनी गुन्हा न नोंदवल्यामुळे विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली होती. हे प्रकरण आष्टी तालुक्यातील चिखली येथे घडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही? असे म्हणत कोर्टाने नोटीस पाठवली आहे. 


पोलिसांनी ऐकलं नाही, विद्यार्थ्याने कोर्टात घेतली धाव-


बीड आष्टी तालुक्यातील चिखली येथे एका विद्यार्थ्याला वर्गात मारहाण करून त्याला विष पाजण्याप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंदाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनराज चखाले या विद्यार्थ्याला वर्गातीलच काही मित्रांनी मारहाण करून विष पाजलं होतं. त्यानंतर धनराज चखाले याने पोलिसात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करून न घेतल्याने विद्यार्थ्याने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यानंतर खंडपीठाने मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


पोलिसांना खडसावले, नोटीसही पाठवली - 


या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही? असा प्रश्न उपस्थित करत औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाचे सचिव, बीड आणि अहमदनगरचे पोलीस अधीक्षक, आष्टी येथील पोलीस निरीक्षक आणि अहमदनगरच्या पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या कृतीबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली. कोर्टाकडून पोलिसांना खडसावले अन् नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे.


नेमकं काय झालं होतं ? 


बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अध्यापक विद्यालयामध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून धनराज चखाले याला अजय गुंड आणि अविष्कार जगताप यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याला विश्व पाजण्यात आलं होतं. बेशुद्ध झालेल्या धनराजच्या चखालेवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. विद्यार्थ्याने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे थेट खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. आता खंडपीठ मारहाण करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे. 


आणखी वाचा :


मुरुम पाहिजे म्हणून बोलवलं अन् अपहण केले, कुटुंबाकडे 4 लाखांची मागणी, पोलिसांनी आठ तासात ठोकल्या बेड्या 


Pune Crime News : चिकनशॉप चालकाचा राडा, डोकं फिरलं अन् थेट पोलीस, नागरिकांवर कोयत्यानं केला हल्ला; पुण्यातील नऱ्हे परिसरात गोंधळाचं वातावरण


Kalyan Murder news : दारू पार्टी बेतली जिवावर! किरकोळ वादातून केला मित्राचा खून, हत्येनंतर स्वत:च पोलिसांना केला फोन आणि...