Kalyan Crime News :  दारू पार्टीत एका छोट्याशा गोष्टीवरून झालेला वाद हा एकाच्या जीवावर बेतले आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादात एकाने आपल्या मित्राचीच  हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी (Manpada Police)  एका तरूणाला अटक केली आहेत. या घटनेने कल्याणध्ये खळबळ उडाली आहे.


दोन मित्र पार्टनरशीपमध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते .या आनंदात दोघांनी पार्टी दिली. मात्र या  दारूपार्टीमध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली.  वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात अटक केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. 


खून करून स्वत:च दिली पोलिसांना माहिती


मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीज ची गाडी सुरु करणार  होते. दोघांची तयारी झाली होती.काही दिवसातच यांचे चायनीज सेंटर सुरू होणार  होते .यामुळे वाजिद सय्यद  आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्मानाधीन इमारतीमध्ये पार्टी दिली होती. या ठिकाणी त्यांचे मित्र देखील होते. पार्टी दरम्यान वाजिद व परेशमध्ये वाद झाला.  या वादातून परेशने वाजिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने  हल्ला केला त्यात वाजिदचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले या प्रकरणी मानपाडा  पोलिस पुढील तपास करत आहे .


 टिटवळ्यात संतापाच्या भरात मित्राला जागेवरच संपवलं


टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात पाच मित्र दारु पित बसले होते. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर यांची दारु पार्टी सुरू असताना राजन आणि एकात वाद झाला. एकमेकांना शिवी देत होते. या दरम्यान रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी झाडली. या गोळीबारात राजन येरकर हा घटनास्थळीच ठार झाला. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


हे ही वाचा :


Kalyan Crime News : बायको आणि मुलाचं आयुष्य संपवून झाला पसार, कल्याणमधील घटनेमुळे खळबळ