Gunratna Sadavarte On Manoj Jarange : मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार असून, गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी सदावर्ते यांच्याकडून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर काही गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांची अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांची हीच पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबई आंदोलनला परवानगी देऊ नयेत अशीआमची मागणी असल्याचे सदावर्ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना सदावर्ते म्हणाले की,“ संविधानक अधिकारांमध्ये तुम्हाला शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, कुणाला वेठीस धरण्याचा अधिकार नाही. म्हणजेच शांती उध्वस्त करण्याचा अधिकार नाही. त्यासोबतच तुमची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि ज्या प्रकारे आज पुन्हा बंद दिसते. ज्याप्रकारे शाळा बंद आहेत, दळणवळणाची साधनं बंद आहेत. मुंबईतल्या मार्केट कमिटी बंद आहेत. ज्यात कष्टकऱ्यांच्या तोंडातलं घास आणि पोटावरची गोष्ट असेल. या सगळ्या गोष्टी अत्यंत वेदनाजनक असल्याचे सदावर्ते म्हणाले.
पुढे बोलतांना सदावर्ते म्हणाले की, आज दुसऱ्या न्यायालयाने अडीच वाजता ही सुनावणी तातडीने घेतली आहे. ज्यात मुंबईत होणारी एण्ट्री आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आंदोलनाच्या संदर्भात अडीच वाजता सुनावणी होईल असे सदावर्ते म्हणाले.
सर्व जबाबदाऱ्या सरकारवर ढकलून चालणार नाही.
सायनबाग सारख्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची जबाबदारी आमच्यासारख्या वकिलांसह सामान्य लोकांवर आहे. त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या सरकारवर ढकलून चालणार नाही. आशा सर्व परिस्थितीत न्यायालयाने कसं लक्ष ठेवावं याबाबत देखील सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश आहे. त्यामुळे कायदेशीरप्रमाणे ही केस न्यायालयाच्या समोर आली असल्याचे सदावर्ते म्हणाले.
राजकीयदृष्ट्या करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत महत्व वाटत नाही
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात काय झालं सर्वांना माहित आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये काय होत आहे. 30 किलोमीटरपर्यंत रांगा आहे. रुग्णवाहिका किती तास उभ्या आहे. मुंबईला श्वास घेण्यासाठी एक कोटी लोक येऊ शकतात आणि जाऊ शकतात. मात्र, तीन कोटी लोकं आणून वेठीस धरण, मंत्र्यांच्या बंगल्या संदर्भात बोलणे सुरु आहे. आंदोलन कशी आहेत तर खजूर खायचे, दूध प्यायचं असे सगळं तंदुरुस्त राहून आंदोलन करायची. शासकीय डॉक्टरांनी तपासणी करायची नाही, फक्त खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची. हे थोतांड आंदोलन आहे. राजकीयदृष्ट्या करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत मला महत्व वाटत नाही, असे सदावर्ते म्हणाले.
न्यायालय आम्हाला न्याय देईल...
मला कुणाचा अपमान करायचा नाही. सर्वसामान्य आणि कष्टकरी मराठ्यांना चुकीच्या मार्गाने नेण्याची जी दिशा आहे, ती दिशा आंदोलक म्हणून गुन्हेगारी स्वरूपातून बाजूला असावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे, आजच्या सुनावणीत न्यायालयाकडे या सर्वगोष्टी मांडणार आहोत. त्यामुळे न्यायालय संविधानाकप्रमाणे आम्हाला न्याय देईल असे सदावर्ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला?; जरांगे म्हणाले, आता थेट नावाचं उघड करतो...