एक्स्प्लोर

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: बाळासाहेब सरवदे प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: सोलापूर महापालिका निवडणुकीच्या काळात राजकीय वैमनस्यातून गाजलेल्या मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात (Balasaheb Sarvade Case) जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजपच्या नगरसेविका शालन शिंदेचा  (Shalan Shinde) जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र, याच प्रकरणातील सहआरोपी आणि शालन शिंदेची बहीण शारदा शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: नेमके प्रकरण काय?

सोलापूरच्या रविवार पेठेतील जोशी गल्लीत 2 जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. महापालिका निवडणुकीत अपक्ष अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेला होता. फिर्यादी बाजीराव सरवदे यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी बाळासाहेब सरवदे यांना निवडणूक न लढवण्यासाठी धमकावले होते. वादाच्या वेळी आरोपींनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकून छातीवर शस्त्रांनी वार करत त्यांना संपवण्यात आले होते. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात शिंदे कुटुंबातील 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद

जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी शालन शिंदेच्या जामिनाला तीव्र विरोध केला. "गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून हा खून राजकीय वैमनस्यातून करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि भक्कम वैद्यकीय पुरावे आहेत. जर आरोपीला जामीन मिळाला, तर त्या सरकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याची दाट शक्यता आहे," असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. राजवैद्य यांनी शालन शिंदेचा अर्ज फेटाळला.

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: शारदा शिंदेला जामीन का मिळाला?

शारदा शिंदे यांच्या वतीने अॅड. संतोष न्हावकर यांनी बाजू मांडली. शारदा शिंदेने मृताच्या डोळ्यात चटणी टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालात चटणीचे कोणतेही अंश आढळले नाहीत. तसेच इतर साक्षीदारांनी त्यांच्यावर कोणतेही ठोस आरोप केलेले नाहीत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा मुद्दा लक्षात घेत न्यायालयाने शारदा शिंदेला जामीन मंजूर केला असून चार महिन्यांच्या अटकेनंतर त्या बाहेर येणार आहेत.

Solapur Crime Balasaheb Sarvade Case: शालन शिंदेची हायकोर्टात धाव

दरम्यान, जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता शालन शिंदेचे वकील उच्च न्यायालयात (High Court) जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा 

Nagpur Crime News: IIIT नागपूरमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, तोंडात कापड कोंबून नवव्या मजल्यावरुन खाली उडी मारली, हाताच्या नसा....

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध, रागाच्या भरात आईनेच संपवलं पोटच्या मुलीला, उल्हासनगर हादरलं 
घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध, रागाच्या भरात आईनेच संपवलं पोटच्या मुलीला, उल्हासनगर हादरलं 
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
नंदूरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल
नंदूरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
Embed widget