एक्स्प्लोर

Crime News : धक्कादायक! गावठी कट्टा दाखवताना दिराकडून ट्रिगर दबला, गोळीबारात वहिनीचा मृत्यू

Shirdi Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नजीकच्या पोहेगाव येथे गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला आहे. गावठी कट्टा दाखवत असताना ट्रिगर दाबला गेल्याने ही घटना घडली आहे.

Crime News : भावाच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवत असताना दिराकडून ट्रिगर दाबला गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नजीकच्या पोहेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावजयीवर रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असून फरार झालेल्या संशयित आरोपी दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशाल भालेराव असे संशयिताचे नाव आहे तर सुनिता भालेराव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे गुरुवारी सकाळी ही गोळीबाराची घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी विशाल भालेराव हा महिलेचा दीर असून त्याने गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा वहिनी सुनिता भालेराव यांना दाखवत असताना आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता भालेराव यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दीर घटना स्थळावरून पसार झाला. 

घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे आदींनी घटनास्थळी धाव घेतली, अशी माहती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे. 

गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता यांना आगोदर खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर शिर्डी, नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळी थेट डोक्यातून आरपार घुसल्याने सुनिता या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे उपाचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर फरार झालेला आरोपी दीर विशाल भालेराव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चुकून गोळी सुटली की त्यानेच गोळी झाडली, अशा चर्चांना उधाण आले आहे. आरोपीकडे अनधिकृत गावठी कट्टा कुठून आला? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईचा 'नटवरलाल'; 17 वर्ष सरकारी रुग्णलय आणि बेस्टकडून घेत होता पगार, फसवणुकीचा गुन्हा दाखल  

नामांतराला विरोध करणाऱ्या अबु आजमींना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget