एक्स्प्लोर

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय

Saptashrungi Devi Temple: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Saptashrungi Devi Temple: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या (Saptashrungi Devi Temple) कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची तफावत आढळली असून, या 'चांदी अपहार' प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Saptashrungi Devi Temple: नेमकं प्रकरण काय?

सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. जुन्या नोंदींनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठी 406 किलो चांदी वापरण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. अशा प्रकारे सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचे उघड झाले आहे.

Saptashrungi Devi Temple: प्रशासनाची कडक पावले

25 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवले आहे. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Saptashrungi Devi Temple: नियम धाब्यावर बसवल्याचा संशय

ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या खुलाशात धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, चांदी काढताना पंचनामा करणे, तिचे अधिकृत वजन करणे आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया नियमांनुसार पार पडली नाही. यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय बळावला आहे.

Saptashrungi Devi Temple: आंदोलनानंतर प्रकरणाला वाचा

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी 2026 पासून याविरोधात आंदोलन छेडले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सुरुवातीला दाद मिळत नव्हती, मात्र राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे तक्रार गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आहे.

Saptashrungi Devi Temple: फौजदारी कारवाईची मागणी

या प्रकरणात ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अपहार केलेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाविकांमध्ये संतापाची लाट असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: माझ्या अंगात दैवी शक्ती, माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, रुद्राक्षाची भीती दाखवून भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं; अशोक खरातनंतर 'महेशगिरी'चं भयानक कांड

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Accident News: ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
Embed widget