एक्स्प्लोर

मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडले 22 तोळे सोनं अन् काडतुसं

Chhatrapati Sambhajinagar Robbery : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरमधील वाळुजमधील सर्वात मोठ्या दरोड्याच्या घटनेत एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे . रोहिणीकडे 22 तोळे सोने सापडले असून घराची झडती घेतल्यानंतर सात जिवंत काडतुसेही सापडली आहेत . आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेले 30 किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडली होती . या प्रकारामुळे आता या संपूर्ण घटनेला वेगळेच वळण लागले आहे .  (Santosh Ladda Robbery)

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता .या दरोड्यात संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला . या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत . दरम्यान,  एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला  पोलिसांनी अटक केली आहे .रोहिणीकडेच 22 तोळे सोनं सापडलं असून घराची झडती घेतल्यानंतर सोन्यासोबत सात जिवंत काढत असेही सापडले आहेत .

एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक

पोलिसांनी सुपारी घेऊन भावाचा एन्काऊंटर केला असा आरोप लड्डा दरोडा प्रकरणात आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीने रोहिणी खोतकरने काही दिवसांपूर्वी केला होता. माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की त्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, जी एका श्रीमंत व्यक्तीने दिली आहे. मी घरी आलो नाही तर समजून जा संपवले आहे, असं तो सतत म्हणायचा असा आक्रोश रोहिणी खोतकरने केला होता. त्यानंतर आता त्याच्या बहिणीलाच अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. 

जादूटोण्याच्या सहाय्याने आखला चोरीचा डाव, पण...  

संतोष लड्डा यांच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून ठेवेलेले आहेत, अशी टीप त्यांचाच जवळचा मित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. पण, बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदारांना ही रक्कम जादूटोणा करून पळवायची होती. म्हणजे एक महाराज जादूटोणा करतो आणि घरात असलेले पैसे हात न लावता बाहेर काढतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तो महाराजही शोधून ठेवला होता. पण, याबाबतची माहिती हासबे नावाच्या आरोपीला मिळाली होती. हासबे याने त्याच्या टीमसह संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकत मुद्देमाल पळवून नेल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकर यांने गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा:

वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget