एक्स्प्लोर

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात एसआयटीने चौकशीला बोलावलं, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची आज एसआयटीकडून चौकशी होणार आहे.

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज एसआयटीसमोर (SIT) हजर होणार आहेत. यासाठी त्या आज सकाळी पुण्याहून (Pune) नाशिककडे (Nashik) रवाना झाल्या आहेत. नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या चौकशीसाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः उपस्थित राहून रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

एसआयटी चौकशीआधी रूपाली चाकणकर यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, एसआटीचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे. त्यांना तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपासाला सामोरे जात असताना जी जी मदत पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्याला मी सहकार्य करेल. तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलीय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय बोलतंय याची मला कल्पना नाही. दरम्यान, समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेत असलेल्या अशोक खरातच्या बँक खात्यांशी चाकणकरांचा संबंध काय? याबाबत विचारले असता रूपाली चाकणकर म्हणाल्या की, यात जी खाती होती ती सर्व बनावट खाती आहेत. त्याचा अहवाल समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

Anjali Damania on Rupali Chakankar: वकिलांना बाहेर ठेवा अन् चाकणकरांची चौकशी करा : दमानिया

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या एसआयटी चौकशीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटीकडे मोठी मागणी केलीय. अंजली दमानिया म्हणाल्या की, गेले दोन महिने मी खरात प्रकरण बघत आहे. यातले अनेक खुलासे लोकांसमोर येत नाही. जी माहिती मला मिळाली. ती मी एसआयटीच्या सातपुते मॅडम यांना माहिती दिली. तेव्हा 9 महिल्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत.  एसपींकडे जगदंबा पतसंस्थेची चौकशी सुरु आहे. यात डीजींना मी पत्र लिहून विचारणा केली होती की, इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि इतरांची चौकशी झाली पाहिजे. आज रुपाली चाकणकर चौकशीला जात आहेत.  आज त्या जात असताना गाड्या बदलत आहेत. वकिलांना घेऊन गेल्या आहेत. एसआयटीने त्या वकिलांना बाहेर ठेवले पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. 

आणखी वाचा 

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी निघाल्या, वाटेत गाडी बदलली, 3-4 वेळा थांबवली; नेमकं काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Embed widget