एक्स्प्लोर

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी निघाल्या, वाटेत गाडी बदलली, 3-4 वेळा थांबवली; नेमकं काय काय घडलं?

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर राहणार आहेत.

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar SIT Inquiry) आज एसआयटीसमोर हजर राहणार आहेत. यासाठी आज सकाळी पुण्याहून नाशिकसाठी रुपाली चाकणकर रवाना झाल्या.

नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात रूपाली चाकणकर चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रूपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासोबत महिला वकील उपस्थित राहणार आहेत. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच सदर प्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांची एसआयटी आणि पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता रुपाली चाकणकरांचीही अशोक खरात प्रकरणात चौकशी होणार आहे. दरम्यान, 22 मे पर्यंत अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case)

रुपाली चाकणकरांनी गाडी बदलली- (Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case)

एसआयटी चौकशीसाठी रवाना होताना रुपाली चाकणकर यांनी वाटेत गाडीही बदलल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुण्याहून नाशिकला निघताना रुपाली चाकणकरांनी 3 ते 4 वेळा गाडीही थांबवली. 

रुपाली चाकणकरांच्या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष- (Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case)

रूपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून, सकाळी 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास त्या एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर विविध आरोप करण्यात आले असून, आज एसआयटीकडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.

रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित- (Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case)

अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य राहिल्यामुळे रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच अशोक खरातचे जाहीर कौतुक करताना, त्याचे पाय धुवतानाचे रुपाली चाकणकरांचे व्हिडीओही समोर आले. यानंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवसांआधी रुपाली चाकणकरांची बहीणीची देखील चौकशी झाली होती. त्यानंतर आज रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी होणार आहे.

अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार- (Ashok Kharat Case)

अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल होणार आहे. अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार प्रकरणाच्या 8 आणि फसवणुकीचा 1 असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. अशोक खरातच्या अटकेनंतर 60 दिवसाच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेल्या जबाबच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल होणार आहे. 

कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश (Ashok Kharat Case)

अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी जमीन खरेदी फसवणूक व अवैध सावकारी गुन्ह्यात तपासाला वेग दिला आहे. मात्र अशोक खरात अर्धवट माहिती पोलिसांना देत असून कल्पना खरातबाबत त्याने पूर्णपणे मौन बाळगले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी पथकाने नाशिक प्रकरणातील निदा खानाला महिनाभरात ताब्यात घेतले असले तरी गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आज या अशोक खरातची कोठडी संपणार असून आज जमीन खरेदी प्रकरणातील साक्षीदार व अशोक खरात यांची समोरासमोर चौकशी सुरू आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat and Rupali Chakankar: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर होणार; चौकशीसाठी पुण्याहून नाशिककडे रवाना

Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget