एक्स्प्लोर

Ahilyanagar : भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात

Rajendra Gadge : मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूला गजाआड करण्यात आलं आहे. त्याचा दरबारही आता सील करण्यात आला आहे. 

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’ चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गडगेच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर सिल केला असून तब्बल चार तास झाडाझडती घेण्यात आली. या कारवाई दरम्यान दरबारात स्पॉट पंचनामा करण्यात आला. तसेच विविध औषधांचे नमुनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून गडगेच्या कथित दरबारामागील संपूर्ण जाळं उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बीडच्या तरुणाची फसवणूक

अहिल्यानगरमधील संगमनेरच्या भोंदू बाबाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. पोटाचा आजार दूर करण्याच्या आणि लग्न जमवून देण्याच्या नावाखाली या भोंदूनं बीडमधील तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी भोंदूनं तब्बल 22 हजार रुपये उकळल्याची माहिती तरुणाने दिली. याबाबत तरुणाने भोंदू बाबाबाबत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. 

वडगावपान इथं मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूला गजाआड करण्यात आलं आहे. दत्तधाम सरकार नावाने तो दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भोंदूविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेला अटक केली. आता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजेंद्र गडगेच्या भोंदूगिरीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. व्यवसायातील नुकसानासह, सांधेदुखी, मणक्याचा त्रास, कॅन्सरसारखे आजार मंत्राने बरे झाल्याचा दावा भोंदू राजेंद्र गडगे  करायचा. त्याचे काही व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करायचा. 

10 वर्षांपासून सुरू होते काळे कारनामे 

गेल्या 10 वर्षांपासून राजेंद्र गडगे हा व्यवसाय करत होता. या काळात त्याने शेकडो कुटुंबांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेला अटक केली. पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र गडगे याच्यासह मधुकर शिंदे, गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी आणि सुरज शिंदे यांना अटक केलीय. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Embed widget