एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?

Ahilyanagar Crime News: संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे 'दत्तधाम सरकार' नावाने स्वतःचा दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Ahilyanagar Crime News: "मला दैवी शक्ती प्राप्त आहे, मी मंत्रशक्तीने कॅन्सरसारखा आजार बरा करू शकतो," अशा गप्पा मारून भोळ्या-भाबड्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या संगमनेरमधील एका भोंदूबाबाचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगावपान येथे 'दत्तधाम सरकार' नावाने स्वतःचा दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याच्यावर पोलिसांनी (Police) कारवाई केली असून, त्याच्या लुटमारीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

Ahilyanagar Crime News: यूट्यूबच्या माध्यमातून जाळे आणि खोटे दावे

राजेंद्र बापू गडगे याने केवळ प्रत्यक्ष दरबारच नाही, तर तंत्रज्ञानाचा वापर करून 'दत्तधाम सरकार' नावाचे यूट्यूब चॅनलही सुरू केले होते. या चॅनलवर तो बनावट व्हिडिओ टाकायचा, ज्यामध्ये मंत्रोच्चाराने असाध्य आजार बरे झाल्याचा दावा केला जात असे. ज्या महिलांना मूल होत नाही, त्यांना अपत्यप्राप्ती करून देणे, कर्करोग (कॅन्सर) समूळ नष्ट करणे आणि घरातील कौटुंबिक कलह दूर करणे अशा आमिषांना बळी पडून ग्रामीण भागातील लोक त्याच्या जाळ्यात ओढले जात होते.

Ahilyanagar Crime News: हजारो रुपयांची वसुली 

हा भोंदूबाबा केवळ सल्ले देऊन थांबत नसे, तर तो श्रद्धेचा बाजार मांडून अवाढव्य रक्कम उकळायचा. समस्या निवारणासाठी तो भक्तांकडून 15 हजार, 21 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंतची रक्कम 'देणगी' किंवा 'दक्षिणा' म्हणून उकळत असे. गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने तो रुग्णांना कसलातरी पालापाचोळा औषध म्हणून द्यायचा. यामुळे आजार बरे होण्याऐवजी अनेकांना गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Ahilyanagar Crime News: 10 वर्षांपासून सुरू होते काळे कारनामे 

गेल्या 10 वर्षांपासून राजेंद्र गडगे हा व्यवसाय करत होता. या काळात त्याने शेकडो कुटुंबांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेला अटक केली. पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र गडगे याच्यासह मधुकर शिंदे, गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी आणि सुरज शिंदे यांना अटक केलीय. 

Ahilyanagar Crime News: कायद्याचा फास आवळला

आरोपींविरुद्ध केवळ फसवणुकीचाच नाही, तर अत्यंत कडक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, आयटी (IT) ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

आणखी वाचा 

Ashok Kharat Crime News: अशोक खरातविरोधात तक्रारींचा पाऊस, हेल्पलाईनवर 23 दिवसांत शेकडो कॉल्स, आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, आज भोंदूबाबाला पुन्हा कोर्टात हजर करणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
Nashik Crime News: नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला 'ट्रिपल तलाक'; पती म्हणाला, 'आज से तू हलाल नही, हराम हो गई', गुन्हा दाखल
नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला 'ट्रिपल तलाक'; पती म्हणाला, 'आज से तू हलाल नही, हराम हो गई', गुन्हा दाखल
Vasai Crime News: लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
Pune Crime News: रेलिंगला धरलं, बराच वेळ मदतीसाठी आरडाओरड; हात निसटला अन् ती थेट आठव्या मजल्यावरून खाली पडली, कारणही आलं समोर
रेलिंगला धरलं, बराच वेळ मदतीसाठी आरडाओरड; हात निसटला अन् ती थेट आठव्या मजल्यावरून खाली पडली, कारणही आलं समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?

Embed widget