Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलीसांनी फरार असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. या चार जणांपैकी एक जण कास्टिंग डायरेक्टर असल्याचं कळतंय. पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महाराष्ट्राबाहेर पळाले होते. ते गोवा आणि शिमला येथे लपले होते. पण यापैकी एक आरोपी कास्टिंग डायरेक्टर नरेश रामावतार पाल हा वर्सोवा (Versova) इथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
नरेश रामावतार पाल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य तीन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींवर एका वेब सीरीझच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी असलेले राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vassisth) हे जामीनावर बाहेर आहेत. पोलिसांनीही या प्रकरणी न्यायायलायत 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.
आरोपी सय्यद सैय्यद आणि अब्दुल सई यांना गोरेगाव आणि अमन बरनवार याला बोरीवलीमधून अटक करण्यात आली. रिपोर्टनुसार, कास्टिंग डायरेक्टर नरेश पाल अभिनेत्रींकडून जबरदस्ती पॉर्न फिल्म शूट करून घेऊन त्यांना केवळ 2000 रुपये मानधन देत होता. या कामामध्ये बाकी तीन आरोपी त्याला मदत करत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chandrapur Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! आईनंच सुपारी देऊन केली मुलीची हत्या
- फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले
Bitcoin Fraud : तिसरी शिकलेल्या व्यक्तीने लाखो लोकांना फसवले, क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली 200 कोटी लुबाडले
- धक्कादायक : नोकरीच्या नावाखाली फसवणूक; तरुणाच्या शरीरातून काढलं 4800 ML रक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha