Chandrapur Crime: चंद्रपूर जिल्ह्यातून माय- लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेनं आपल्या मुलीची नातेवाईकांना सुपारी दिली. त्यानंतर राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील राहणाऱ्या नातेवाईकांनी संबंधित महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. याप्रकरणी मृत महिलेच्या आईसह तिच्या नातेवाईकांना विरूर पोलिसांनी अटक केलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सैदा बदावत (वय, 30) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. सैदा ही तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी आहे. तसेच ती नवऱ्यापासून विभक्त झाली होती. सैदाच्या चारित्र्याबाबत तिच्या आईला शंका होती. दरम्यान, गर्भपात करण्याच्या बहाण्यानं सैदाच्या आईने तिला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडं पाठवलं. तसेच सैदाची हत्या करण्यासाठी नातेवाईकांना 30 हजारांची सुपारी दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. 


18 फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत मृतदेह आढळला होता. या परिसरात अज्ञात असलेल्या या महिलेची ओळख पटविण्यासाठी विरूर पोलिसांनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये तिचे फोटो पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आलीय. सौदाच्या आईनंच चारित्र्याच्या संशयावरून आपल्या मुलीची सुपारी देऊन हत्या केल्याची पोलिसांनी माहिती दिलीय. सौदाची आई लचमी, सीन्नू आणि शारदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विरूर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केलीय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha