Job fraud : गेल्या काही काळात सगळीकडेच नोकऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. अगदी उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील अनेकांना म्हणावी तशी नोकरी मिळत नाही. दरम्यान, काही जणांना नोकरी मिळते, पण मग म्हणावा तसा पगार मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर रोजगाराच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार देखील वाढले आहेत. खोट्या जाहिराती दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. असंच एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे. नोकरीच्या नावाखाली एका व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या देशांत नेऊन त्याला विकलं.


हे प्रकरण आहे तरी काय?


हा अजब प्रकार चीनमध्ये घडला. 'ली' नावाच्या एका व्यक्तीने वृत्तपत्रात नोकरीची जाहिरात वाचली होती. ही नोकरी मिळवण्यासाठी तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे त्याला नाईट क्लबमध्ये बाऊंसरची नोकरी आहे, असं सांगण्यात आलं. परंतु नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर कंबोडियामध्ये नेऊन त्याला विकलं गेलं. एका गँगनं तब्बल 13 लाख रुपयांच्या बदल्यात त्याला खरेदी केलं.


ही गँग दररोज त्याचं रक्त काढत होते. 6 महिन्यात त्याचं तब्बल 4800 ML रक्त काढण्यात आलं. सतत रक्त काढल्यामुळे तो अशक्त झाला होता. त्याच्या शरीरातील काही अवयव काम करण्याचं देखील बंद झाले होते. शेवटी कसाबसा तो त्या टोळीच्या तावडीतून पळून गेला. चीनमध्ये परत येताच त्याला रग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रक्तदान करताना 325 ते 473 एमएल रक्त काढलं जातं. परंतु या व्यक्तीच्या शरीरातून खूप जास्त रक्त काढण्यात आलं. दरम्यान, पोलीस नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्या या टोळीचा शोध घेत आहेत.


महत्वाच्या बातम्या :