रायगड: नेरळमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी भाऊ, वहिनी आणि एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिघांचीही कसून चौकशी सुरू असून आरोपींना दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून हा कट सूचल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे रायगड जिल्हा हादरला आहे.
नेरळमधील 40 वर्षीय मदन पाटील, 35 वर्षीय अनिशा पाटील आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विवेक पाटील यांची ते शनिवारी रात्री झोपलेले असताना डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. हत्या करण्यापुर्वी विषप्रयोग झाला होता का यासाठी व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी म्हणजे मृत पुरुषाच्या भावाला दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून हा कट सुचल्याचं तपालात समोर आलं आहे.
नेरळ कर्जत येथे ऐन गणपती उत्सवात तिहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली. एकाच घरातील पती, पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नेरळ पोलीसांनी संशयीत तीन आरोपींना ताब्यात घेवून कसून चौकशी सुरू केली आहे.
मुलगा विवेकच्या हट्टापाई याच वर्षी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. दरम्यान ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी मयतांचे जवळचे नातेवाईक आहेत. यातील प्रमुख संशयीत हा क्राईम पेट्रोल, दृश्यम सारखे चित्रपट पहात असल्याचे समोर आलं आहे. मयत पाटील कुटुंबीय गावातील सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येत असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
पोशिर गावातील चिकनपाडा या गावात आज एका मृत व्यक्तीची दशक्रिया विधी सुरू असताना नदीवर गेलेल्या ग्रामस्थांना पाणी वाहणाऱ्या नाल्यात एक आठ वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनंतर या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली.
ही बातमी वाचा :