एक्स्प्लोर

नवऱ्याने घेतलेला मोबाईल परत न केल्याने बायकोने विळ्याने त्याचे ओठच कापले!

नवऱ्याने घेतलेला मोबाईल परत न केल्याने बायकोने रागात आपल्या पतीचे विळ्याने ओठ कापल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तालुक्यातील मासळ येथे घडली आहे.

भंडारा : आजच्या आधुनिक युगात मोबाईलला अनन्य साधारण महत्व आले आहे. लहान मुलांपासून थोर मोठ्यांना मोबाईलने वेड लावले आहे. मोबाईलमुळे अनेक तरुणाईला भुरळ पडल्याने अनेकांचे जीवन उध्वस्त झाले तर अनेक कुटुंबात कलह निर्माण करण्याचे कामसुद्धा मोबाईलने केले. मोबाईल काहींसाठी तारक तर अनेकांसाठी मारक ठरताना दिसत आहे. अशाच एक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल न मिळाल्याने रागावलेल्या पत्नीने आपल्या पतीचे विळ्याने ओठच कापल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाईलच्या आहारी गेलेल्या पत्नीने पतीने हातातला मोबाईल न दिल्याने चक्क आपल्याच नवऱ्याला विळ्याने मारहाण करून त्याचे ओठच कापले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली आहे. खेमराज बाबुराव मूल वय 40 असे जखमी पतीचे नाव आहे. ह्या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील 40 वर्षीय खेमराज मूल यांचा मोबाईल मागील तीन दिवसांअगोदर बिघडला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल काही दिवस वापरासाठी मागितला. त्यानंतर दोन दिवस होऊनही मोबाईल पत्नीला दिला नाही, त्यामुळेच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. यात रागाच्या भरात पत्नी प्रेमीना खेमराज मुल हिने घराच्या खोलीत असलेला लोखंडी विळा आणून पती खेमराजच्या तोंडावर वार केला. त्यामुळे खेमराजचे ओठ कापले असून जबर दुखापत झाली. त्याला लागलीच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरच्या अहवालावरून आणि तक्रारदार खेमराज मूलच्या तोंडी तक्रारीवरून लाखांदुर पोलिसात पहाटे 1 वाजता आरोपी पत्नी प्रेमीना खेमराज मूल हिच्यावर कलम 324, 504 भादंवीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे.

ही घटना घडल्यानंतर लाखांदूर तालुक्यात खळबळ पसरली आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, याचं प्रमाण शहरी भागात जास्त आहे. मात्र, आता ग्रामीण भागतही मोबाईलमुळे कुटुंबकहल वाढत असल्याने चिंत व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget