एक्स्प्लोर

Pune Crime : 'साप आला म्हणून आधीच धक्का दिला होता...' लोहगड केस प्रकरणी केतनच्या वडिलांचा सियाच्या कुटुंबावर संशय; सखोल चौकशीची मागणी

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case :  पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याप्रकरणात मृत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी आरोपी सिया गोयल हिच्या संपूर्ण कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली आहे. 

पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) होणारा पती केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाने आता अधिक गंभीर स्वरूप धारण केलं आहे. केतनची हत्या केवळ त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केली की यामध्ये सियाच्या कुटुंबाचाही हात होता? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांसमोर येत अत्यंत भावूक आणि खळबळजनक वक्तव्य केलं. या हत्येच्या कटात सियाच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Lohagad Fort Case Pune : 'साप आला... साप आला...' म्हणून आधीच रचला होता कट

केतनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी घडलेल्या या अंतिम घटनेपूर्वीही सियाने केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, जो आता समोर आला आहे. विशाल अग्रवाल म्हणाले की, 14 जून रोजी जेव्हा ते दोघे लोहगडावर गेले होते, तेव्हा तिथे 'साप आला, साप आला' असं ओरडत सियाने केतनला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने तो प्रयत्न फसला. तो प्रकार घडल्यानंतर तिने केतनला मिठी मारली. त्यावेळी तिथे कोणताही साप नव्हता, तर तो त्याला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न होता, हे आता आमच्या लक्षात येत आहे. तिची विकृती तेव्हाच समोर आली असती तर आज माझा मुलगा वाचला असता."

Siya Goyal Lohagad Case : तिच्या घरच्यांचेही प्लॅनिंग होतं का?

विशाल अग्रवाल यांनी या गुन्ह्यात मुलीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, "साखरपुडा झाला होता, पण जर लग्न मनाविरोधात चालले होते, तर स्पष्ट नाही म्हणायला काय हरकत होती? खून करायची काय गरज होती? सियाचे बाहेर प्रेम होते, माझ्या मुलावर नव्हते, तरीही तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाचा, आमच्या पैशांचा आणि आनंदाचा उपभोग का घेतला? या संपूर्ण कटात तिच्या घरच्या लोकांचंही काही प्लॅनिंग होतं का? याची पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन प्रत्येक धागादोरा शोधला जावा."

Ketan Agarwal Father Statement : आमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं

आपला 26 वर्षांचा तरुण मुलगा गमावल्याचे दुःख व्यक्त करताना केतनचे वडील म्हणाले की, "त्या मुलीने आमचे हसतंखेळतं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. आम्ही आज फक्त नावालाच जिवंत आहोत. एका आई-वडिलांसाठी यापेक्षा मोठे दुःख जगात असू शकत नाही."

यासोबतच, लग्न ठरवताना मध्यस्थी करणाऱ्या चुलत मामा-मामी नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांच्यावर विश्वास ठेवणे हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासावर विश्वास असून, न्यायदेवता आरोपींना कठोर आणि फाशीसारखी शिक्षा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पुणे पोलीस आता या नव्या दाव्याच्या आधारे सियाच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा: 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget