एक्स्प्लोर

Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: 'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन

Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आलेली.

Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: पुण्याच्या (Pune) लोहगड (Lohagad) किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketan Agarwal) पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेनं सर्वांना अक्षरशः हादरवून सोडलं. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला 'मर्डर प्लॅन' (Ketan Agarwal Murder Case) असल्याचं निष्पन्न झालं. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता. यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकरानं केतनला दरीत ढकललं. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानं दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आलीय. 

केतन अग्रवाल आणि सिया गोयल (Siya Goyal) यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आलेली. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियानं आणि चेतननं ठरवलं आणि लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली. आता या प्रकरणानं संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलीय. सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केतनचे कुटुंबीय करत आहेत. तसेच, इतरही अनेकजण सिया गोयलला कठोरता कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी करत आहेत. देशभरातून केतनला न्याय मिळावा, असा एकच सूर ऐकू येतोय. पण, अशातच एका डॉक्टर महिलेनं मात्र केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणाऱ्या डॉक्टरवर शिस्तभंगाची कारवाई 

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या धक्कादायक हत्या प्रकरणाची एका डेंटिस्ट असलेल्या महिलेनं खिल्ली उडवलीय. एका संतापजनक पोस्टद्वारे हिंसेचं समर्थन करणाऱ्या डॉ. मुस्कान सोनी या डेंटल डॉक्टर तरुणीवर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशननं AIDSA कठोर कारवाई केली आहे. या डॉक्टर महिलेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पाच वर्षांसाठी तिचं निलंबन करण्यात आलंय. केतन अग्रवालच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, डॉ. सोनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेची थट्टा करणारी एक 'स्टोरी' पोस्ट केल्याचा आरोप आहे. संघटनेनं ही पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह, अपमानजनक आणि संघटनेच्या नैतिक मूल्यांशी विसंगत असल्याचं मानलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुस्कान नेमकं काय म्हणालेली? 

डेंटल असलेल्या डॉ. मुस्कान सोनी हिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये असं ऐकू येतंय की, "तो माणूस टक्कल असलेला होता. अशा पुरुषांनी मरायलाच हवं, #Ihatemen. दोन जणांचा मृत्यू झालाय आणि संपूर्ण समाज दहशतीखाली आहे..." हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि मुस्कान सोनीला जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. ट्रोलिंग वाढल्यानंतर सोनीनं एक व्हिडीओ शेअर केला आणि माफी मागितली. 

इतक्या संवेदनशील विषयाची थट्टा करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, असं तिनं स्पष्ट केलं. ती म्हणाली, "मी वापरलेल्या शब्दांसाठी मनापासून माफी मागते... लिंगाच्या आधारावर मी कधीही कोणाचाही अवमान करत नाही... मी माझ्या पोस्ट्समध्ये #ihatemen हा हॅशटॅग वापरते हे खरंय. तो काढून टाकण्याची माझी तयारी आहे. मात्र, माझ्या आयुष्यात घडलेल्या काही विशिष्ट घटनांमुळेच मला हा हॅशटॅग वापरावा लागला..."

सोनीनं आरोप केला की, तिला शाब्दिक छळाचा सामना करावा लागत आहे आणि लोक तिला 'स्लट' (Slut) आणि 'वेश्या' यांसारखी अपमानास्पद विशेषणं लावत आहेत. तिनं ट्रोल करणाऱ्यांना हे वागणं थांबवण्याचं आवाहन केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketan Agarwal Case: 'केतन अग्रवालसोबत असंच व्हायला हवं होतं... सियाला जामीन द्या'; महिलेच्या वक्तव्यांनी सारेच हैराण, नेटकरी म्हणाले, 'खरोखरंच दृष्ट...'

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget