एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे खळबळ; CCTV फुटेज समोर येताच सर्व हादरले

Pune Crime News: उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बाथरूममध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी मोठी खळबळ उडाली.

Pune News: पुणे हडपसर परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये (Ushakiran Hospital in Hadapsar) बाथरूममध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात नष्ट केली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममधील बेसिनखाली ही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येऊन बाथरूममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

नेमकं काय घडलं? (Ushakiran Hospital in Hadapsar)

दरम्यान, बाथरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली. डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचे दिसून आले. टायमरवर 7.21 अशी वेळ दिसत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टर गायकवाड यांनी हॉस्पिटलमधील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून धाडस दाखवत ती वस्तू स्वतः हाताने उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू- (Ushakiran Hospital in Hadapsar)

माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बॉम्ब सूट परिधान करून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आणि ग्लायडिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित पद्धतीने नष्ट केली. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितले? (Ushakiran Hospital in Hadapsar)

उषा किरण हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विलास गायकवाड यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे सातच्या दरम्यान हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये चमचम करणारी संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी तात्काळ याची माहिती मला दिली. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला चार कांड्या, टायमर आणि केबलच्या वायर एकमेकांना जोडलेल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती बॉम्बसदृश वस्तू असावी असा संशय आला. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. त्यांच्या जीवाची काळजी मला सतावत होती. त्यामुळे काहीही विचार न करता मी ती वस्तू काळजीपूर्वक उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटलसमोरील मोकळ्या मैदानात नेऊन ठेवली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ती संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Accident News: बोरघाटात थरारक अपघात! पुणे-मुंबई महामार्गावर मिनी बस उलटली; घटनास्थळी गोंधळ, मदतीसाठी आरडाओरडा अन्...

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget