एक्स्प्लोर

Pune Crime News: कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Pune Crime News: पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता.

पुणे : पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने स्टोअर रूममध्ये (Pune Crime News) नेऊन या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा कोचिंग क्लास आहे. या घटनेप्रकरणी ऑफिस बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. विकास गायकवाड असं 35 वर्षीय ऑफिस बॉयच नाव आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही ऑफिस बॉयने (Pune Crime News) काढले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता.(Pune Crime News)

Pune Crime News: अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली अन्...

मागील दोन ते तीन वर्षापासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला  स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. आणि त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. क्लासला जायला नकार देत असल्याने वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. त्यानंतर मुलानेच हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला आणि आई-वडिलांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता. मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.(Pune Crime News)

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, स्टोअर रूमसारख्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था होती का, तसेच कर्मचाऱ्यांची पडताळणी योग्य पद्धतीने करण्यात आली होती का, याबाबत पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी क्लासमधील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी इतर कोणासोबत केले आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
ACB Raid: रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?

Embed widget