एक्स्प्लोर

Pune Budhwar peth Crime: बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून झाडाझडती

Pune Budhwar Peth news: बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचे व्हिडीओ तयार करुन त्यांना धमकावले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या लोकांकडून पैसे उकळले जात होते.

Budhwar peth Pune: अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्यात आता लोकांना लुबाडण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar peth) वेश्यागमनासाठी (Prostitution) जाणाऱ्या व्यक्तींचे व्हिडीओ चित्रित करुन त्यांना ब्लॅकमेल (Blackmailing) करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. नांदेड सिटी (Nanded City Pune) पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या  मुसक्या आवळल्या. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी एका आयटी इंजिनिअरला अशाचप्रकारे गाठून त्याच्याकडून 20 हजार रुपयांची मागणी केली. हा आयटी इंजिनिअर तरुण सिंहगड रोडवरील किरकिटवाडी भागात राहायला होता. तो आणि त्याचा मित्र 13 जुलैला एका कामानिमित्त बुधवार पेठेच्या परिसरात गेले होते. त्यावेळी हा तरुण त्याची बाईक घेऊन बुधवार पेठेच्या परिसरात उभा होता. त्यावेळी आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ काढला. काम आटोपल्यानंतर या दोघांनी आयटी इंजिनिअरचा नांदेड सिटी येथील घरापर्यंत पाठलाग केला. हा तरुण विवाहित होता. हा प्रकार घडला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलं घरी नव्हती. आयुष चौगुले आणि सदफ पठाण यांनी या तरुणाला घराजवळ गाठून, 'तू बुधवार पेठेत कशाला गेला होतास?', असा प्रश्न विचारला. त्यानंतर आयुष आणि सदफने बुधवार पेठेत चित्रित केलेला व्हिडीओ दाखवून तरुणाला धमकावले. त्याच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, या तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी संबंधित तरुणाला घाबरवण्यासाठी आणखी एक डाव टाकला. 'तू आमच्याकडून 20 हजार रुपये रोख घेतले आहेत. हे पैसे तू आम्हाला ऑनलाईन पद्धतीने परत देणार होतास. तू ते पैसे दिले नाहीस तर आम्ही पोलिसांत तक्रार करु. चौकशीवेळी आम्ही बुधवार पेठेतील तुझे व्हिडीओ आणि फोटो पोलिसांना देऊ. तुझी बदनामी करु', असे आयुष आणि सदफने संबंधित तरुणाला सांगितले. त्यानंतरही हा तरुण त्यांना पैसे द्यायला तयार नव्हता. अखेर या दोघांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांकडे या दोघांनी आयटी इंजिनिअर असलेल्या तरुणाची तक्रार केली. सुरुवातीला पोलिसांना आयुष आणि सदफचे म्हणणे खरे वाटले आणि त्यांनी तरुणालाच जाब विचारायला सुरुवात केली. अखेर एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीने या तरुणाने आपली बाजू पोलिसांना तपशीलवार समजावून सांगितली. तेव्हा हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांनी आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांना अटक केली. 

आणखी वाचा

बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग, 20 हजार दे नाहीतर बदनामीची धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं

व्हिडीओ

Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
Embed widget